गुजरातमध्ये बस अपघातात 21 जणांचा मृत्यू, 30 जखमी

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात भीषण बस अपघात (Gujrat bus accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पलटल्यामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये बस अपघातात 21 जणांचा मृत्यू, 30 जखमी

अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात भीषण बस अपघात (Gujrat bus accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पलटल्यामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 प्रवाशी जखमी आहेत. अपघातावेळी बसमध्ये (Gujrat bus accident) एकूण 65 प्रवासी होते, असं सांगितलं जात आहे. या अपघातामुळे गुजरातमध्ये सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

एका लग्झरी बस अंबाजी मंदीरवरुन येत होती. या दरम्यान अंबाजीच्या त्रिसुलिया घाटातील रस्त्यात बस अचानक दरीत कोसळली. अपघातात 21 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

बनासकांठा बस अपघातात मृतांची संख्या 18 वर गेली आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी एसजी शाह यांनी सांगितले, तर काही मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 21 पेक्षा अधिक असल्याचे बोललं जात आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असंही म्हटलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत बनासकांठा अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “अपघातातबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटलं. ही दु:खाची वेळ आहे. मी सर्व मृतांच्या परिवारासोबत आहे. स्थानिक प्रशासन प्रत्येकाच्या मदतीसाठी झटत आहे. मी अपेक्षा करतो जखमींवर त्वरीत उपचार होतील आणि ते लवकर बरे होतील”.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI