चीनला धडकी, भारताला लवकरच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार, रशियाचं आश्वासन

रशियाने गुरुवारी (12 नोव्हेंबर) लवकरच भारताला जमिनीवरुन हवेत मारा करु शकणारे एस-400 (S-400 Missile) क्षेपणास्त्रं प्रणाली देणार असल्याचं म्हटलं.

चीनला धडकी, भारताला लवकरच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार, रशियाचं आश्वासन


मॉस्कोव : रशियाने गुरुवारी (12 नोव्हेंबर) लवकरच भारताला जमिनीवरुन हवेत मारा करु शकणारे एस-400 (S-400 Missile) क्षेपणास्त्रं प्रणाली देणार असल्याचं म्हटलं. तसेच हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी कठोर मेहनत करत असल्याचंही सांगितलं. भारताला पुढील वर्षाच्या अखेरिस या क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला जाणार आहे. रशियाच्या मिशनचे उपप्रमुख रोमन बबुशिकन यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली (Hard work is being done to ensure early supply of S 400 Missile system to India says Russia).

रोमन म्हणाले, “दोन्ही देश परस्पर सहकार्यावर (लॉजिस्टिक सपोर्ट) काम करत आहेत. याशिवाय दोन्ही देश अब्जावधी डॉलरच्या व्यवहारावर देखील काम करत आहेत. या अंतर्गत भारत-रशिया संयुक्त उपक्रम भारतीय सैन्यासाठी 200 कामोव केए-226 टी युद्ध हेलीकॉप्टरचं उत्पादन करेल.”

भारत आणि अमेरिकामधील ‘बेका’ कराराचा भारतीय सैन्य आणि रशियाच्या या करारावर काही परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला असता रोमन बबुशिकन यांनी थेट कोणतंही उत्तर दिलं नाही. केवळ भारत आणि रशियाचे संबंध कोणत्याही निर्बंध आणि परदेशी हस्तक्षेपाच्या पलिकडचे असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही भारत आणि अमेरिकेसह अन्य देशांमधील रणनीतीकडे आणि संबंधांवर बारीक लक्ष आहे. असं असलं तरी आम्हाला विश्वास आहे की भारताचे इतर देशांशी वाढणारे संबंध हे रशियाशी असलेल्या हितसंबंधांची किंमत मोजून होणार नाही.”

“राहिला भाग भारतासोबत रशियाच्या संरक्षण संबंधांचा तर हे संबंध कोणत्या निर्बंधांच्या आणि परदेशी हस्तक्षेपाच्या पलिकडचे आहेत. त्याचा भारत-रशिया संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही. कारण दोन्ही देशांचे संबंध हे राष्ट्रीय हिताशी बांधिल आहेत आणि आम्ही हे संबंध वाढवण्यासाठी मोठ्या विश्वासाने प्रवास करत आहोत,” असंही बबुशिकन यांनी नमूद केलं.

भारताला वेळेत क्षेपणास्त्र प्रणाली देणार

बबुशिकन म्हणाले, “एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली पुरवठा करण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. रशियाकडून भारताला पहिली खेप 2021 च्या शेवटी मिळेल, अशी आशा आहे. आम्ही हा पुरवठा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत.”

दरम्यान, भारताने ट्रम्प प्रशासनाने इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर 2018 मध्ये 5 एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी रशियाशी 5 अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

संबंधित बातम्या :

रशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू

Corona Vaccine: रशियाचा मोठा दावा, कोरोनावर बनवली तिसरी लस

Vladimir Putin | पुतीन यांची गंभीर आजाराशी झुंज, रशियाचं अध्यक्षपद सोडण्याची शक्यता

व्हिडीओ पाहा :

Hard work is being done to ensure early supply of S 400 Missile system to India says Russia

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI