महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त नाही, अफवांना बळी पडू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

आतापर्यंत कोरोनावर कोणतंही अँटी-व्हायरल ड्रग उपलब्ध नाही. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष (isolation ward) सुरु केल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. Health Minister Rajesh Tope on Coronavirus

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त नाही, अफवांना बळी पडू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात एकही जण कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत केलं. (Health Minister Rajesh Tope on Coronavirus)

राज्यात सहा कोरोना संशयित निरीक्षणाखाली होते. त्यामध्ये मुंबईतील चौघांचा तर पुण्यातील दोघांचा समावेश होता. परंतु त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याचं सांगत, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही टोपे यांनी केला.

देशात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. परदेशातून येणाऱ्या रुग्णांबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता राजेश टोपे यांनी बोलून दाखवली. आतापर्यंत कोरोनावर कोणतंही अँटी-व्हायरल ड्रग उपलब्ध नाही. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष (isolation ward) सुरु केल्याचंही टोपेंनी सांगितलं.

राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘कोरोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा बेड्स स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे’ अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. (Health Minister Rajesh Tope on Coronavirus)

कोरोना व्हायरसवर अद्यापही उपाय सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षतेचे काही उपाय सुचवले (Corona Virus Easy Remedy) आहेत. नियमित हात धुणे, मास्क वापरणे यासारख्या सवयी कोरोनापासून दूर राहण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.

कोरोनापासून बचावासाठी महत्त्वाचे : Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

Published On - 1:39 pm, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI