देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशभरात 1,344 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे (India corona patients).

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 1,344 जणांनी कोरोनावर मात केली आहे (India corona patients). कोरोनाविरोधात भारताची लढाई सुरु असून आतापर्यंत 11,933 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,344 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून 10,197 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली (India corona patients).

“कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉन हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अग्रवाल बोलत होते.

“ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत किंवा कोरोनाचं संक्रमण वेगानं सुरु आहे, अशा जिल्ह्यांना हॉटस्पॉट जिल्हे घोषित करण्यात आलं आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही त्या जिल्ह्यांना ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 170 जिल्हे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. तर 207 जिल्हे नॉन हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत”, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

“देशाच्या कॅबिनेट सचिवांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिव, डीजीपी, आरोग्य सचिव, डीएम, एसपी, महापालिका आयुक्त यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी कोरोनाविरोधात जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या”, असं लव अग्रवाल म्हणाले.

संबंधित बातम्या :

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात

राजकारणात राजकीय संघर्ष नेहमीचा, कोरोनाचा पराभव हे आपले उद्दिष्ट : शरद पवार

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, ‘जी दक्षिण’मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

Published On - 8:12 pm, Wed, 15 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI