AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन चर्चा केली होती. (Health Science University Exams to be held from 15th July)

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी
| Updated on: Jun 05, 2020 | 10:06 AM
Share

मुंबई : आरोग्य विज्ञानाचे (हेल्थ सायन्स) शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. कुलपती म्हणजेच राज्यपालांनी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला होकार दिला. येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी आहे. (Health Science University Exams to be held from 15th July)

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन चर्चा केली होती. लॉकडाऊनदरम्यान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दाखवली आहे. राज्यपालांनी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली.

परीक्षेबाबत तीन प्रस्ताव

-पहिल्या प्रस्तावात सर्व लेखी परीक्षा 15 जुलै ते 15 ऑगस्टमध्ये होणार

-कोरोनामुळे परीक्षा घेणं शक्य न झाल्यास लेखी परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरमध्ये घेण्यात येतील

-दोन्ही पर्याय जमले नाहीत, तर ऑनलाईन किंवा दुसऱ्या पद्धतीनुसार परीक्षेचा निर्णय होईल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस. पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या आणि तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. (Health Science University Exams)

हेही वाचा : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

दरम्यान, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निश्चित केले जाईल, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली. “15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी”, असे आवाहन अमित देशमुख यांनी केलं आहे.

संबंधित बातमी : 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

(Health Science University Exams to be held from 15th July)

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.