बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालकांना अटकेचा इशारा

राज्यभरात शेतकऱ्याच्या संपूर्ण हंगामातील मेहनतीवर पाणी सोडण्याचं काम करणारा बोगस बियाणांचा प्रश्न गंभीर बनला आहे (High Court on defaulted Seed company).

बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालकांना अटकेचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 9:44 AM

औरंगाबाद : राज्यभरात शेतकऱ्याच्या संपूर्ण हंगामातील मेहनतीवर पाणी सोडण्याचं काम करणारा बोगस बियाणांचा प्रश्न गंभीर बनला आहे (Aurangabad High Court on defaulted Seed company). याच प्रश्नावर टीव्ही 9 मराठीने केलेल्या वृत्तांकनाची गंभीर दखल घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी कृषी विभागाकडून गांभीर्य न दाखवल्याने न्यायालयाने कृषी सहसंचालकांना स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हजर न राहिल्यास थेट अटक करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील बोगस बियाणे प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. टीव्ही 9 मराठीने बोगस बियाणे प्रकरणी केलेल्या वृत्तांकनानंतर न्यायालयाने स्वतः याची दखल घेतसुमोटो याचिका दाखल करुन घेतली. तसेच याचिकेवरील सुनावणी दरम्यान कृषी विभागाने गांभीर्य न दाखवल्याने फटकारले देखील आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

न्यायालयाने कृषी सहसंचालकांना 13 जुलै रोजी न्यायालया समोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कृषी सहसंचालक हजर न राहिल्यास न्यायालयाने त्यांच्यावर कारवाईचाही इशारा दिला आहे. यानुसार कृषी सहसंचालक हजर न राहिल्यास न्यायालय थेट त्यांच्या अटकेचे देखील आदेश देऊ शकते.

औरंगाबाद उच्च न्यायालयाने बोगस बियाणे प्रकरणी कडक पाऊलं उचलल्यानंतर बोगस बियाणे विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम आणि मेहनत खराब करुन त्यांना अडचणीत टाकणाऱ्या बोगस बियाणांच्या कंपन्या आधी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होत्या. मात्र, आता थेट उच्च न्यायालयानेच शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आता लवकरच दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, ‘या’ खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी

Maharashtra Corona Update | राज्यात सलग पाचव्या दिवशी 3 हजार पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, पण बाधितांचा आकडा वाढताच

Corona Update | कोरोनाची लस किमान सहा महिने तरी बाजारात येणार नाही : आदर पूनावाला

Aurangabad High Court strict on defaulted Seed company

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....