VIDEO : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

VIDEO : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

मुंबई : निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा नवीन चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विल स्मिथ स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातील कलाकारांसोबत थिरकताना दिसत आहे. यामुळे विल स्मिथही यामध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान करण जोहर यांना विल स्मिथबद्दल विचारण्यात आले यावर करण जोहर म्हणाला, “विल स्मिथ फेसबुकवरील एक शो ‘बकेट लिस्ट’च्या शूटिंगसाठी भारतात आला होता. स्मिथला बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करण्याची इच्छा आहे. चित्रपटात विल स्मिथ काम करणार आहे किंवा नाही यांवर मी काही सांगणार नाही. तुम्हाला हे माहित करुन घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.”

स्टुडंट ऑफ द इअर 2 चित्रपटात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे तसेच तारा सुतारिया आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 10 मेला प्रदर्शित होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI