AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कंटेनरमध्ये तब्बल 300 मजूर कोंबले, पोलिसांनी रोखल्यानंतर धक्कादायक चित्र समोर

कोरोना संसर्ग नियंत्रण मोहिम युद्धपातळीवर सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट  येथे वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला आहे (Human Trafficking in Yavatmal amid Corona)

एका कंटेनरमध्ये तब्बल 300 मजूर कोंबले,  पोलिसांनी रोखल्यानंतर धक्कादायक चित्र समोर
| Updated on: Mar 26, 2020 | 6:49 PM
Share

यवतमाळ : कोरोना संसर्ग नियंत्रण मोहिम युद्धपातळीवर सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट  येथे वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला आहे (Human Trafficking in Yavatmal amid Corona). नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वर तेलंगाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्याची सीमा लागते. येथून 300 जणांना कंटेनरमध्ये अगदी जनावरांप्रमाणे कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात होते. पोलिसांच्या सतर्कतेने ही बाब उघडकीस आली आहे. जमावबंदी आणि संचारबंदी लागू असतानाही समोर आलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

तेलंगाणावरून निघालेला कंटेनर (एच.आर.73/ए-6983) पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबवला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचं कुलूप उघडायला लावलं. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. जवळपास 300 जण या कंटेनरमध्ये अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.

नागपूरवरून जनावरे कत्तलीसाठी हैदराबादला अशाप्रकारे नेण्यात येत होती. हाच अनुभव गाठिशी असल्याने तेलंगाणा सीमा सील करण्यात आली. त्यानंतर छुप्या पद्धतीने येथील व्यक्तींना महाराष्ट्रात आणले जाईल हे गृहित धरून पोलिसांनी पडताळणी केली. त्यानंतर जवळपास 300 जण अवैधरित्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे उघड झाले. या अमानवीय प्रकाराबाबत पांढरकवडा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरूनच तेलंगाणात परत पाठवण्यात आले.

Human Trafficking in Yavatmal amid Corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.