प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

दिव्यांग पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन, मृतदेह जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात उघडकीस आला आहे. (Buldana husbands murder by wife)

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

बुलडाणा : दिव्यांग पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन, मृतदेह जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात उघडकीस आला आहे. (Buldana husbands murder by wife) या थरारक घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करुन मृतदेह जमिनीत गाडल्याच्या 15 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. गणेश सरोजकर असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.

प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने पत्नीने तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला दारुतून विषारी औषध पाजलं. त्यानंतर पतीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह लडाणा जिल्ह्यातील आवळखेड शिवारात पुरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

गणेश सरोजकर गेल्या 15 दिवसांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह चार आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गणेश आणि त्याची आरोपी पत्नी सागवण परिसरातील गायनंबर येथे राहत होते. गणेशवर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तो पत्नीला किरकोळ कारणांवरुन सतत मारहाण करत होता. दरम्यानच्या कालावधीत पत्नीचे सूत त्या परिसरात राहणाऱ्या आरोपी अनिल सुरोशे याच्याशी जुळले. ही बाब गणेशला कळाली. तेव्हा त्याने पत्नी आणि अनिलला जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने आरोपी पत्नीने प्रियकर आणि त्यांच्या मित्रांसोबत पतीचा काटा काढला. त्यानंतर मृतदेह आवळखेड शिवारात पुरला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केला.

(Buldana husbands murder by wife)

संबंधित बातम्या 

औरंगाबादमध्ये गळा चिरुन बहिण-भावाची हत्या, परिसरात खळबळ  

लातुरात थरार, अनैतिक संबंधातून पतीची हत्या, मग पत्नीची आत्महत्या, अखेर प्रियकरानेही स्वतःला संपवलं 

Published On - 11:13 am, Wed, 10 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI