मलाही घटनास्थळी न्या आणि गोळ्या घाला, हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या गर्भवती पत्नीचा आक्रोश

मलाही घटनास्थळी नेऊन गोळ्या घाला, असा आक्रोश हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी चिन्नाकेशवुलूच्या गर्भवती पत्नीने केला.

मलाही घटनास्थळी न्या आणि गोळ्या घाला, हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या गर्भवती पत्नीचा आक्रोश
Follow us
| Updated on: Dec 06, 2019 | 1:35 PM

मुंबई : आपल्या मुलांना जी शिक्षा द्याल, ती मंजूर असेल, अशी भूमिका हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या पालकांनी घेतली होती, मात्र आरोपी पळून जाताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले आणि खंबीर कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. मलाही घटनास्थळी नेऊन गोळ्या घाला, असा आक्रोश चिन्नाकेशवुलूच्या गर्भवती पत्नीने (Hyderabad Rape Accuse Family) केला.

हैदराबादमधील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. मात्र आरोपींच्या चकमकीनंतर त्यात दोन गट पडले आहेत. सर्वसामान्यांकडून पीडितेला मिळालेल्या झटपट न्यायाचं स्वागत होत आहे, मात्र पोलिसांनी हातात कायदा न घेता, कोर्टात जलद न्याय देत फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, अशी भावना दुसऱ्या गटाकडून व्यक्त केली जात आहे.

‘माझा मुलगा गेला… हे चुकीचं आहे.. माझा मुलगा तर गेला… मला कळत नाही त्यांनी काय केलं. मला काय बोलावं सुचत नाही’ अशी प्रतिक्रिया मुख्य आरोपी आरिफच्या आईने दिली. आरिफच्या आईच्या डोळ्याला धार लागली होती.

‘माझा मुलगा दोषी सिद्ध झाला होता, तर त्याला गोळी मारायलाच हवी’ असं दुसरा आरोपी शिवाच्या आईचं म्हणणं आहे. मात्र शिवाच्या वडिलांनी यावर सवाल उपस्थित केले आहेत. ‘फक्त याच प्रकरणातील चौघांना ही शिक्षा का? इतर बलात्काऱ्यांनाही ही शिक्षा मिळायला हवी’ असं शिवाचे वडील म्हणाले.

‘त्यांना जेलमध्ये ठेवण्याऐवजी मारुन टाका, असं आम्ही आधीच बोललो होतो. पण त्यांना मारण्याआधी आम्हाला मुलांना पाहण्याची शेवटची संधी तरी मिळायला हवी होती’ अशी भावना आरोपी नवीनच्या वडिलांनी व्यक्त केली.

चौथा आरोपी चिन्नाकेशवुलूची आई जयम्मा यांनी आधीही आपल्या मुलाला शिक्षा देण्याची मागणी केली होती. ‘माझ्या मुलाने गुन्हा केला असेल, तर त्यालाही जाळून टाका. माझ्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही. चूक ही चूक असते. पीडितेच्या आईने नऊ महिने मुलीला गर्भात वाढवून जन्म दिला. ती मुलगी अशा घृणास्पद गुन्ह्याला बळी पडली. त्या माऊलीला काय वाटत असेल?’ अशा भावना जयम्मा यांनी व्यक्त केल्या होत्या.

माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी

चिन्नाकेशवुलूची गर्भवती पत्नी मात्र पुरती हादरुन गेली आहे. ‘लग्नानंतर वर्षाच्या आतच तो मला सोडून गेला. तुम्ही त्याला जिथे नेऊन मारलंत, तिथे मला न्या आणि गोळ्या घालून मलाही ठार मारा. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत’ असं म्हणत त्याची पत्नी धाय मोकलून रडायला लागली (Hyderabad Rape Accuse Family). दोन दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने, आपला पती सुखरुप घरी न आल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले.

कशी झाली चकमक? हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर 27 नोव्हेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनी तिची हत्या करुन मृतदेह पेटवला होता.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

आधी तिघांचा, आता चौघांचा एन्काऊंटर, ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे IPS व्ही सी सज्जनार!

हैदराबाद डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार आरोपींचा एन्काऊंटर, उदयनराजेंकडून आधी अभिनंदन, नंतर ट्वीट डिलीट

हैदराबाद एन्काऊंटर : चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे, पण… उज्ज्वल निकम

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.