हे काम करणाऱ्या माझ्या चाहत्याला मी ‘व्हॅलेन्टाईन डे’ला डेट करणार : दिशा पटाणी

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींच्या यादीत दिशा पटाणीचा समावेश होतो. सध्या तरुणांमध्ये दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तिला डेट करण्याचं स्वप्न अनेक मुलं पाहत असतात. मात्र हे शक्य होणे कठीण आहे. दिशाच्या चाहत्यांनी अनेकदा ही ईच्छा सोशल मीडियावर दिशा समोर व्यक्त केली आहे. पण आता […]

हे काम करणाऱ्या माझ्या चाहत्याला मी 'व्हॅलेन्टाईन डे'ला डेट करणार : दिशा पटाणी
Follow us

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींच्या यादीत दिशा पटाणीचा समावेश होतो. सध्या तरुणांमध्ये दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तिला डेट करण्याचं स्वप्न अनेक मुलं पाहत असतात. मात्र हे शक्य होणे कठीण आहे. दिशाच्या चाहत्यांनी अनेकदा ही ईच्छा सोशल मीडियावर दिशा समोर व्यक्त केली आहे. पण आता ही ईच्छा पूर्ण होणार आहे. दिशा पटाणी तुमच्यासोबत डेट करु शकते आणि ते सुद्धा वर्षाच्या सर्वात रोमँटिक दिवशी अर्थात ‘व्हॅलेन्टाईन डे’ या दिवशी तुम्ही दिशासोबत डेट करु शकता.

अभिनेत्री दिशा पटाणीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, व्हॅलेन्टाईन डेला ती आपल्या चाहत्यांमधील एका कुणाला तरी डेट करणार आहे. त्यासाठी त्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत एक व्हिडीओ अपलोड करत सांगावे लागेल की, ते का दिशासोबत डेट करण्यास ईच्छुक आहेत.

View this post on Instagram

This Valentine’s, @reliancetrends and @filmfare want one of you to go for a date with me! All you have to do is upload a short video telling me why I should go on a date with you :) This is going to be so much fun. So please upload your video by 7th Feb and use #TrendsDateWithDisha

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने व्हिडीओमध्ये विशेष करुन सांगितलं आहे की, पाठवण्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये एकही ‘चीजी लाईन्स’ नसावी. तसेच यावेळी दिशाने या व्हिडीओमध्ये हिंट दिली आहे की, ती व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी कोणता ड्रेस घालणार आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI