नियम बदलताच, डिस्चार्जची संख्याही वाढली, सौम्य लक्षण आढळल्यास टेस्ट न करताच डिस्चार्ज

रविवारी देशात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1,668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातही रविवारी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आलं.

नियम बदलताच, डिस्चार्जची संख्याही वाढली, सौम्य लक्षण आढळल्यास टेस्ट न करताच डिस्चार्ज

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या 67 हजारांच्या (ICMR Change The Rules) पुढं गेली आहे. मात्र, आता डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.  त्याचं कारण म्हणजे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावलीत केलेला बदल. डिस्चार्ज संदर्भातले नियम बदलल्याने त्याचा तात्काळ परिणाम (ICMR Change The Rules) पाहायला मिळत आहे.

रविवारी देशात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1,668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातही रविवारी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत देशभरात 1,559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नियम बदलल्यानं डिस्चार्जची संख्या कशी वाढली आणि नवे नियम काय?

  • उपचारानंतर सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसल्यानंतर 3 दिवस ताप नसेल, तर 10 दिवसांतच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल
  • सौम्य लक्षणं आढळल्यानंतर कोरोना टेस्ट न करताच त्यांना डिस्चार्ज मिळेल
  • गंभीर रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांची डिस्चार्जच्याआधी टेस्ट करण्यात येईल
  • गंभीर रुग्णांचा ताप 3 दिवसात उतरला आणि पुढचे 4 दिवस शरिरात ऑक्सिजनची मात्रा 95 टक्के राहिल्यास 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल (ICMR Change The Rules)
  • जे रुग्ण गंभीर आहेत आणि व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची लक्षणं दूर झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळेल
  • डिस्चार्जनंतर या रुग्णांना आता घरी 14 ऐवजी 7 दिवसच आयसोलेशनमध्ये राहावं लागेल

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील खाटा आणि कोरोना टेस्ट किटची उपलब्धता लक्षात घेता अभ्यास करुन हा निर्णय घेतल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञही ICMR शी सहमत आहेत.

कोरोनाबाधितावर उपचार केल्यानंतर सौम्य लक्षणं असेल तर तो बरा होतो आणि अशा व्यक्तीमुळे संसर्ग होत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असल्यास टेस्ट न करताच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. ICMR ने सध्या उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे हा निर्णय घेतला असला, तरी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांनी विलगीकरणात राहून स्वत:च्या तब्येतीसंदर्भात अधिक लक्ष्य ठेवावं (ICMR Change The Rules) लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI