AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फिल्डिंग कोच फिदा, म्हणाले ‘मौत डाल दिया मियां!’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि सलामीवीर शुभमन गिल या युवा खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फिल्डिंग कोच फिदा, म्हणाले 'मौत डाल दिया मियां!'
| Updated on: Dec 26, 2020 | 8:16 PM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसावर पूर्णपणे टीम इंडियाचं वर्चस्व राहिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. टीम इंडियाकडून मैदानात चेतेश्वर पुजारा 7* आणि शुभमन गिल 28* धावांवर नाबाद आहेत. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला. (Maut Daal Diya Miyan Mohammed Siraj interview R Sridhar)

दरम्यान, आजच्या सामन्याद्वारे जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) या युवा खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ढिसाळ कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात एकूण 4 बदल करण्यात आले. यामध्ये दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. तर पृथ्वी शॉच्या जागेवर शुभमन गिल याला ताफ्यात दाखल करुन घेतलं.

सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलला टीम इंडियाची कॅप दिली. गिल टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण 297 वा खेळाडू ठरला. तर गोलंदाज मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं. सिराज टीम इंडियाचा 298 वा खेळाडू ठरला. मोहम्मद सिराजने पदार्पणातच शानदार गोलंदाजी केली. सिराजने आजच्या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना 15 षटकांपैकी 4 षटकं निर्धाव टाकत 40 धावांच्या बदल्यात दोन विकेट्स मिळवल्या. त्याने मार्नस लॅबुशेन आणि कॅमरॉन ग्रीन या दोघांना बाद केलं.

सामन्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आर. श्रीधर (R Sridhar) यांनी हैदराबादी अंदाजात बातचित केली. यावेळी डेब्यू आणि गोलंदाजीचा प्लॅनविषयी सिराजने माहिती दिली. त्यानंतर श्रीधर सिराजचं कौतुक करत हैदराबादी स्टाईलमध्ये म्हणाले की, ‘मौत डाल दिया, मियां.’

श्रीधर यांनी सिराजला विचारले की, “लंच ब्रेकपर्यंत तुला गोलंदाजी दिली नव्हती. तेव्हा डोक्यात काय सुरु होतं. हाथाला खाज सुटली होती का?” यावर सिराज म्हणाला की, “लंचपर्यंत गोलंदाजी मिळाली नव्हती. परंतु अज्जू भाई (कप्तान अजिंक्य रहाणे) आणि जस्सी भाई (जसप्रीत बुमराह) या दोघांनी माझा आत्मविश्वास वाढवला. लंचनंतर गोलंदाजी मिळाली. तेव्हा डोक्यात एकच गोष्ट होती की जास्तीत जास्त डॉट बॉल टाकेन, जेणेकरुन समोरच्या फलंदाजांवर दबाव निर्माण होईल. त्याचा मला फायदाच झाला आणि सुरुवातीलाच एक विकेट मिळाली”.

त्यानंतर श्रीधऱ म्हणाले की, “तुझी गोलंदाजी पाहून मजा आली, एकदम मौत डाल दिया मियां”. त्यावर सिराज उतरला “हां भाई, मौत डाल दिया”.

सामन्याचा लेखाजोखा

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या कांगारुंना टीम इंडियाने सुरुवातीपासून धक्के दिले. ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने विकेट गमावले. ऑस्ट्रेलियाने पहिले 3 झटपट गमावले. यामुळे ऑस्ट्रेलियाची 35-3 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर मार्नस लाबुशाने आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. पण ही जोडी फोडण्यात बुमराहला यश आले. बुमराहने ट्रॅव्हिस हेडला 38 धावांवर बाद केलं. ट्रॅव्हिसने 92 चेंडूत 4 चौकांरासह 38 धावा केल्या.

हेडनंतर काही ओव्हरनंतर मार्नस लाबुशानेही बाद झाला. लाबुशानेला मोहम्मद सिराजने आऊट केलं. लाबुशानेने 132 चेंडूत 4 चौकांरसह 48 धावा केल्या. ही जोडी माघारी गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक विकेट टाकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला.

संबंधित बातम्या

रिषभ पंतची ‘धोनी स्टाईल’, अगोदरच्या बॉलला अश्विनला सल्ला, दुसऱ्या बॉलवर वेडची विकेट!, पाहा व्हिडीओ

AUS v IND, 2nd Test | कर्णधार अजिंक्य रहाणेचे डॅशिंग निर्णय, बॉक्सिंग डे कसोटीत दमदार नेतृत्त्व

AUS vs IND, 2nd Test | अश्विनचं रवी शास्त्रींच्या पावलावर पाऊल, तब्बल 35 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये धमाका

(IND vs AUS : Maut Daal Diya Miyan Mohammed Siraj interview R Sridhar)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.