भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं, तर दोन्ही देशांच्या वायूसेनेत संघर्ष सुरु

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब […]

भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं, तर दोन्ही देशांच्या वायूसेनेत संघर्ष सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पायलट पॅराशूटच्या माध्यमातून उडी फेकत असल्याचंही दिसून आलंय.

दुसरीकडे पाकिस्तानने अत्यंत गंभीर दावे केले आहेत. यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे एका भारतीय पायलटला अटक केल्याचं पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर गफूर यांनी म्हटलंय. भारताचे दोन विमान पाडले, एक काश्मीरमध्ये, तर दुसरं पीओकेमध्ये पाडलं, असा दावा पाकिस्तानने केलाय.

भारतीय वायूसेना एअर स्ट्राईकनंतर हायअलर्टवर आहे. पाकिस्तानी मीडियाने स्वतःची पाट थोपटून घेणं सुरु केलंय. पाकिस्तानी जनतेला काही तरी दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. विमानं पळवून लावली तरीही पाकिस्तानकडून स्वतःची पाठ थोपटवून घेतली जात आहे. आम्ही बदला घेऊ असं पाकिस्तानकडून सातत्याने सांगितलं जात आहे.

दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे भारतीय विमान कोसळलंय. हे विमान आपणच पाडलं असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं मिग हे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बडगाम या जिल्ह्यात कोसळल्याचं बोललं जातंय. या दुर्घटनेत वायूसेनेचे दोन पायलट शहीद झाले आहेत. या विमानांमध्ये एक ते दोनच पायलट असतात. यामध्ये जास्त जवान नसतात, अशी माहिती आहे. सीमेवर सध्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानली जात आहे.

लाईव्ह पाहा :

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.