आता दहशतवाद्यांवर करडी नजर, ‘जीसॅट-29’ अवकाशात झेपावलं!

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून जीसॅट-29 या उपग्रहाचे प्रेक्षपण केले आहे. श्रीहरीकोटा येथे वातावरण अनकूल असल्याने इस्रोकडून बुधवारी(14 नोव्हेंबर) संध्याकाळी ठीक 5 वाजून 8 मिनिटांनी जीसॅट-29 या उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं. जीसॅट-29 हा उपग्रह जीएसएलव्ही-एमके-थ्री डी २ या प्रक्षेपकातून अवकाशात सोडण्यात आले. “जीसॅट-29 […]

आता दहशतवाद्यांवर करडी नजर, ‘जीसॅट-29’ अवकाशात झेपावलं!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून जीसॅट-29 या उपग्रहाचे प्रेक्षपण केले आहे. श्रीहरीकोटा येथे वातावरण अनकूल असल्याने इस्रोकडून बुधवारी(14 नोव्हेंबर) संध्याकाळी ठीक 5 वाजून 8 मिनिटांनी जीसॅट-29 या उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं.

जीसॅट-29 हा उपग्रह जीएसएलव्ही-एमके-थ्री डी २ या प्रक्षेपकातून अवकाशात सोडण्यात आले.

“जीसॅट-29 या उपग्रहात ‘हाय रिझॉल्युशन’ कॅमेरा लावण्यात आला असून, या कॅमेऱ्याला ‘जियो आई’ असं नाव देण्यात आलं आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हिंदी महासागरातील सागरी किनाऱ्यावरील दहशतवाद्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यास मदत होईल.

तसेच, जम्मू-काश्मीरसमवेत उत्तर आणि पूर्व भारतातील इंटरनेटच्या सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.” अशी माहिती इस्रोचो अध्यक्ष के. सिवान यांनी दिली.

जीसॅट-29 वैशिष्ट्ये

या उपग्रहामुळे देशातील संपर्क यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. या उपग्रहाचे वजन ३ हजार ४२३ किलो आहे. जीसॅट-29 हा उपग्रह पुढील १० वर्ष अवकाशात कार्यरत असेल. या उपग्रहाची उंची 13 मजली उंच इमारती इतकी आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें