AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळच नव्हे, भारतातील ‘हे’ महामार्गही वायूदलासाठी सज्ज

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे किंवा आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर भारताची लढाऊ विमानं उतरवण्याची क्षमता आहे. भारतीय वायूदलाने 2015 मध्ये 165 किमीच्या आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर आपलं लढाऊ विमान उतरवलं होतं. त्यानंतर 24 ऑक्टोबर […]

विमानतळच नव्हे, भारतातील 'हे' महामार्गही वायूदलासाठी सज्ज
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे किंवा आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर भारताची लढाऊ विमानं उतरवण्याची क्षमता आहे.

भारतीय वायूदलाने 2015 मध्ये 165 किमीच्या आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर आपलं लढाऊ विमान उतरवलं होतं. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2017 मध्ये आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वे वर भरभक्कम लढाऊ विमानं उतरवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. ज्या मिराज 2000 विमानांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, ती विमानं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर यशस्वीपणे उतरली होती.

जग्वार, सुखोई आणि मालवाहक विमान सीए-130J सुपर हरक्युलिस ही विमानं सुद्धा या एक्स्प्रेस वेवर उतरली होती.

वायूसेनेच्या लढाऊ विमानांसाठी आता गाझीपूरपर्यंत बनलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेवेवरही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं, तर लखनऊ आग्रा एक्स्प्रेसवर एक पट्टी विमानांसाठी राखीव ठेवण्यात येईल.

युद्धजन्य स्थितीत लढाऊ विमानं शहरं आणि वस्तीपासून दूर परिसरात उतरु शकतील, अशा उद्देशाने हे महामार्ग सज्ज ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेशातील जिल्हा प्रशासनाने या महामार्गांवर 24 तास देखरेख ठेवली आहे. पोलिसांची पथक संशयितांना ताब्यात घेत आहेत. जर वायूसेनेकडून संदेश मिळाल्यास या महामार्गावरील रस्ते वाहतूक वळवलीही जाऊ शकते.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.