औरंगाबादच्या पर्यटन स्थळांचे डीपीआर तयार करण्याच्या सूचना, वाचा कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश?

औरंगाबादच्या पर्यटन स्थळांचे डीपीआर तयार करण्याच्या सूचना, वाचा कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश?

औरंगाबादेतील सोनेरी महल येथेही अशा शो बसवण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे डीपीआर तत्काळ सादर करा, अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी बैठकीत दिल्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 21, 2022 | 4:29 PM

औरंगाबादः जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने वेरूळ-अजिंठा लेणी, अहिल्यादेवी कुंड, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort) येथे रोप वे आणि लाइट साउंड शो बसवणे, औरंगाबाद लेण्या (Aurangabad Caves), हनुमान टेकडी येथे रोप वे उभारण्यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यात डॉ. कराड यांनी पर्यटन विकासासाठी सर्व प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या बैठकीला केंद्रीय पर्यटन खात्याचे सचिव अरविंद सिंग, आयटीडीसीचे केव्ही राव, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या महासंचालक विद्यावती, राजेंद्र लोढा आदी उपस्थित होते. तर औरंगाबाद येथून पर्यटन, पुरातत्व विभागाचे अधिकाकरी बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते.

4 ठिकाणी रोप वे बसवणे शक्य

या बैठकीत स्काय या खासगी संस्थेच्या वतीने रोप वे बसवण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी अजिंठा, वेरुळ येथील जगप्रसिद्ध लेण्या, दौलताबाद किल्ल्यावर तसेच घृष्णेश्वर मंदिर या चार ठिकाणी रोप वे बसवणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. दौलताबाद किल्ल्यावर रोप-वे बसवण्यासंदर्भात अडचणी नाहीत. मात्र पर्यटन मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व खात्याची परवानगी लागणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संचालक विद्यावती यांनी संबंधित कन्सल्टंटला डीपीआर बनवण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच बीबी का मकबरा येथे लाइट अँड साउंड शोसंदर्भात प्रयत्न सुरु आहेत.

दौलताबादेत लाइट अँड साउंड शो

दौलताबाद किल्ल्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधीतून रोप वे टाकण्याचे काम केले जाईल. वेरुळ मंदिरात ग्रामीण विद्युतीकरण पब्लिक सेक्टर युनिटच्या माध्यमातून लाइट अँड साउंड शो बसवण्यात येणार आहे. औरंगाबादेतील सोनेरी महल येथेही अशा शो बसवण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे डीपीआर तत्काळ सादर करा, अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी बैठकीत दिल्या.

इतर बातम्या-

सईने नेसली साडी, लूक एकदम भारी, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस!

मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता, निवडणूक आयोगाच्या सूचना काय? वाचा सविस्तर


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें