IPL मधील विस्फोटक फलंदाजीमागचं रहस्य काय? शिखर धवन म्हणतो…

IPL 2021 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला.

IPL मधील विस्फोटक फलंदाजीमागचं रहस्य काय? शिखर धवन म्हणतो...
Shikhar Dhawan
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 4:12 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 11 व्या सामन्यात रविवारी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 18.2 षटकामध्ये 4 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केले. सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. धवनने शानदार 92 धावांची खेळी केली. (IPL 2021 : Shikhar Dhawan says I am not afraid of getting out)

शिखरने एकूण 49 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 92 धावा फटकावल्या. दुर्देवाने शिखर नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. अवघ्या 8 धावांनी शिखरचे शतक हुकले. पण शिखरने दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने केलेल्या या कामगिरीसाठी शिखरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑरेन्ज कॅपचा मानकरी

शिखरने या 92 धावांच्या खेळीसह आयपीएलमधील मानाची ऑरेन्ज कॅपही पटकावली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. शिखरने या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यात 186 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅप सध्या त्याच्याकडे आहे.

“बाद होण्याची भीती वाटत नाही”

धवनला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सामन्यानंतर धवन म्हणाला की, त्याने जोखीम घेणे सुरू केले आहे, तसेच त्याला बाद होण्याची भीती वाटत नाही. त्यामुळेच त्याला विस्फोटक खेळी खेळणे शक्य होतंय. धवन म्हणाला की, “स्ट्राइक रेट वाढवणे ही माझ्या संघाची गरज होती. त्यामुळेच मी जोखीम घ्यायला सुरुवात केली. तसे फटके मारले. मला बदलांची भीती वाटत नाही. मी नेहमी बदलांसाठी सज्ज असतो. मी नेटमध्ये चांगला सराव करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर सामन्यात तशीच फलंदाजी करतो. मला बाद होण्याची (आऊट होण्याची) भीती वाटत नाही.”

‘या’ गोष्टींवर मेहनत घेतली

धवन म्हणाला की, त्याने त्याच्या लेग-साइड शॉट्सवर काम केलं आहे. तो म्हणाला, “मी माझ्या लेग साइड शॉट्सवर काम केले आहे, त्यावर थोडी मेहनत घेतली आहे. क्रीजवर गोलंदाजांच्या वेगाचा फायदा घेण्यावर फोकस केला. माझ्या स्लॉग शॉटमध्ये सुधारणा झाली आहे. मू पूर्वीदेखील असे शॉट्स खेळायचो, परंतु आता मी त्यात तरबेज होतोय. आता मी सातत्याने असे शॉट्स खेळतोय.”

पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप

दिल्लीने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्सला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा आजचा दुसरा विजय ठरला. दिल्ली 4 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. मुंबई आणि दिल्लीचे पॉइंट्स समान आहेत. मात्र दिल्लीचा नेट्स रन रेट चांगला असल्याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

दिल्लीचा पुढील सामना केव्हा?

दिल्लीचा पुढील सामना 20 एप्रिलला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या साम्यात दिल्लीची गाठ गतविजेत्या मुंबईसोबत पडणार आहे. त्यामुळे दिल्लीसमोर मुंबईचे तगडे आव्हान असणार आहे. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

इतर बातम्या

IPL 2021 CSK vs RR Head to Head : संजू सॅमसनसमोर कॅप्टन कूल धोनीचं आव्हान, कोणाचं पारडं जड

IPL 2021: युजवेंद्र चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

IPL 2021: आंद्रे रसेलने भर मैदानात एकदा नाही तर तब्बल पाचवेळा हरभजन सिंहची केली ‘बेइज्जती’, कारण वाचून हैराण व्हाल

(IPL 2021 : Shikhar Dhawan says I am not afraid of getting out)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.