इंजिनमधील गळतीमुळे ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण स्थगित

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO)च्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आलं होतं. जीएसएलवव्ही-एमके-3 च्या क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियमच्या गळतीमुळे इस्रोला चंद्रयान-2 चं प्रक्षेपण स्थगित करावं लागलं होतं.

इंजिनमधील गळतीमुळे ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण स्थगित
Nupur Chilkulwar

|

Jul 16, 2019 | 8:18 AM

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO)च्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आलं होतं. जीएसएलवव्ही-एमके-3 च्या क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियमच्या गळतीमुळे इस्रोला चंद्रयान-2 चं प्रक्षेपण स्थगित करावं लागलं होतं. सोमवारी (15 जुलै) पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चंद्रयान-2 चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र, प्रक्षेपणाच्या 56 मिनिटांपूर्वी ही मोहीम स्थगित करण्यात आली.

तांत्रिक बिघाड झाल्याने हे प्रक्षेपण रद्द करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली होती. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जीएसएलवव्ही-एमके-3 च्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधनाच्या गळती या प्रक्षेपणाच्या स्थगितीमागील कारण असल्याचं सांगितलं गेलं. ‘चंद्रयान-2’ च्या प्रक्षेपणाची पुढील तारीख सप्टेंबर महिन्यात असू शकते.

‘इंजिनमध्ये लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरण्याचं काम सुरु होतं. त्यानंतर आम्हाला हेलियम भरायचं होतं. आम्हाला 350 वेळा हेलियम भरायचं होतं आणि आऊटपूटला 50 वर सेट करायचं होचं. मात्र, तेव्हाच हेलियमचं प्रेशर वेगात खाली येऊ लागलं. यामुळे गळती होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आता आमची टीम ही गळती एकाच ठिकाणाहून होत आहे की अनेक ठिकाणाहून होत आहे, हे तपासत आहे’, असं एका वरिष्ठ वैज्ञानिकाने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.

‘चंद्रयान-2’चं प्रक्षेपण पाहाण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील श्रीहरिकोटामध्ये उपस्थित होते. या प्रक्षेपणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. पहिल्यांदाच 5000 प्रेक्षक हे प्रक्षेपण लाईव्ह पाहाण्यासाठी श्रीहरीकोटा येथे जमले होते. जर हे मिशन यशस्वी झालं असतं, तर भारतासाठी हा एक सूवर्ण दिवस असता. या मिशननंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल.

आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली जीएसएलवव्ही-एमके-3 (GSLV MK-III) रॉकेटने ‘चंद्रयान-2’चं प्रक्षेपण होणार होतं. या मिशनसाठी 978 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ‘चंद्रयान-2’ला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 54 दिवस लागणार होते. गेल्या आठवड्यात या मिशनसंबंधी सर्व रिसर्चनंतर रविवारी सकाळी 6.51 मिनिटांनी याचं काऊंटडाउन सुरु झालं होतं.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें