उत्तर महाराष्ट्रातील 81 हॉस्पिटलवर आयकर खात्याच्या धाडी, सर्च ऑपरेशन सुरु

उत्तर महाराष्ट्रातील 81 हॉस्पिटलवर आयकर खात्याच्या धाडी, सर्च ऑपरेशन सुरु

नाशिक : आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन हाती घेतले असून, एकमागोमाग एक धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत.

नाशिक, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील 81 हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये आयकर विभाग तपासणीकडून केली जात आहे. 129 ठिकाणावरुन छाननीसाठी कागदपत्रे जमा करुन, संशयास्पद नोंदींची छाननी सुरु आहे. या सगळ्या हॉस्पिटलना 7 दिवसात नोटीस पाठवली जाणार आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा या आयकर विभागाच्या पथकात सहभाग असून, त्यात 16 अधिकारी, 265 कर्मचारी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी नाशिकमधील लोटस हॉस्पिटल भंडारी डायग्नोस्टिक प्रथमेश डायग्नोस्टिक आणी विंचूरकर डायग्नोस्टिक या बड्या सेंटरमध्ये आयकर विभागाने सखोल चौकशी सुरु केली होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर कट प्रॅक्टिस करत असल्याची गोपनीय माहिती आयकर विभागाला मिळली होती आणि त्याच माहितीच्या आधारे आयकर विभागाने थेट हॉस्पिटलवर धाडी मारण्यास सुरवात केली होती.

एकंदरीत उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाने मोठं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. अत्यंत मोठं ऑपरेशन असल्याने स्थानिक पोलिसांचीही यात मदत घेतली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI