डोळ्यात काड्या खुपसल्या, डोक्यात विटेने हल्ला, जळगावात 16 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

जळगाव जिल्ह्यात एका 16 वर्षीय (Jalgaon Minor Brutal Murder) अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

डोळ्यात काड्या खुपसल्या, डोक्यात विटेने हल्ला, जळगावात 16 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

जळगाव : जळगाव जिल्ह्यात एका 16 वर्षीय (Jalgaon Minor Brutal Murder) अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना आज (3 मार्च) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना ही खुनाची (Jalgaon Minor Brutal Murder) घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मृत अल्पवयीन मुलगा हा 2 एप्रिलला गावातून अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृतदेह डांभुर्णी शिवारातील दीपक पाटील यांच्या शेतात आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर डांभुर्णी गावात एकच खळबळ उडाली.

डोळ्यात काड्या खुपसल्या, डोक्यात विटेने हल्ला

मारेकऱ्यांनी अल्पवयीन मुलाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये काड्या खुपसल्या (Jalgaon Minor Brutal Murder), त्याच्या डोक्यात विटांचा मारा केला. घटनास्थळी असलेल्या परिस्थितीवरुन त्याची अतिशय निर्घृण हत्या केल्याचे दिसून आलं. मात्र, त्याची हत्या का झाली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन अल्पवयीन मुलालृचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञानांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या यावल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत (Jalgaon Minor Brutal Murder).

Published On - 10:12 pm, Fri, 3 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI