उद्धव ठाकरे यांना या मतदार संघातून उभे करावे, महाविकास आघाडीकडे या नेत्याची मागणी

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. स्वत:मुख्यमंत्री पदावर ते विराजमान देखील झाले होते. परंतू त्यांनी आता स्वत: निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांचा कधी काळचा सहकारी असलेल्या भाजपा पक्षातील नेत्याने केली आहे. यावर एका अन्य पक्षातील नेत्याने तर मतदार संघ देखील सुचवला आहे.

उद्धव ठाकरे यांना या मतदार संघातून उभे करावे, महाविकास आघाडीकडे या नेत्याची मागणी
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 7:15 PM

विधानसभा निवडणूकांची घोषणा लवकरच होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. यातच यंदा महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे सांगायला तयार नाहीत. अशात भाजपाचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्यावर वारंवार टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वत: निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. यावर आता एका नेत्याने मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी मतदार संघ देखील निश्चित केला असून या मतदार संघातून ठाकरे यांना उभे करावे असे पत्र महाविकास आघाडीला लिहीले आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.आता उद्धव ठाकरे यांना यावर काहीही प्रतिक्रीया दिलेली नसली तर अकोला पश्चिम मतदार संघातून उद्धव ठाकरे यांनी उभे रहावे अशी मागणी एका नेत्याने केली आहे. जावेद जकारिया यांनी अशी मागणी करणारे पत्रच महाविकास आघाडीला लिहीले आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना रितसर पत्र लिहून ही मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे अकोला पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर अकोल्यातील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास जावेद जकारिया यांनी व्यक्त केला आहे. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होईल असेही त्यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे. जावेद जकारिया यांच्या या मागणीला आता महाविकास आघाडी कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून अकोला पश्चिम मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे.

कोण आहेत जकारिया ?

जावेद जकारिया हे अकोला येथील जकारिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मुस्लिमातील कच्छी मेनन समाजाचे ते नेते आहेत. अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात त्यांना ओळखले जाते.कोरोना काळात 2200 मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश. मात्र, भाजप आणि शिंदे सेनेतील काही नेत्यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांमुळे त्यांना राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.