चहाच्या पैशांमधून जग भ्रमंती करणारा अवलीया; के. आर. विजयन यांचे निधन

कोचीमध्ये राहाणाऱ्या के. आर. विजयन यांच्या जग भ्रमंतीची चर्चा देशभर झाली. खरतर याच पर्यटनाने त्यांना प्रसिद्धी मिळून दिली. विजय यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

चहाच्या पैशांमधून जग भ्रमंती करणारा अवलीया; के. आर. विजयन यांचे निधन

कोची : कोचीमध्ये राहाणाऱ्या के. आर. विजयन यांच्या जग भ्रमंतीची चर्चा देशभर झाली. खरतर याच पर्यटनाने त्यांना प्रसिद्धी मिळून दिली. विजय यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांचे कोचीमध्ये साधे एक चहाचे हॉटेल होते. पर्यटनाची आवड आणी जग भ्रमंतीची दुर्दम्य इच्छा याच्या जोरावर घरची परिस्थिती जेमतेम असतानाही त्यांनी जगातील अनेक देशांना भेट दिली. चहा विकून जमा झालेल्या पैशांमधून ते आपली बायको मोहना यांच्या सोबत अनेक देश फिरले. तेथील संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला.

बचतीच्या पैशांमधून जग भ्रमंती

के. आर. विजयन यांचा कोचीमध्ये श्री बालाजी कॉफी हाऊस नावाचा चहाचा एक छोटासा स्टॉल होता. ते आपली पत्नी मोहना यांच्यासोबत चहा, कॉफी विक्रीचे काम करायचे , त्यांना सुरूवातीपासून वेगवेगळ्या देशांना भेट देण्याची आवड होती. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. ते दररोज आपल्या कमाईतून 300 रुपयांची बचत करायचे. याच बचतीच्या पैशांमधून त्यांनी 2007 मध्ये पहिला विदेश दौरा केला. त्यांनी आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यामध्ये इस्रायलला भेट दिली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ठरावीक कालंतराने ते विदेशवारी करतच राहिले. त्यांनी 2007 ते 219 अशा 12 वर्षांमध्ये जगातील अनेक देशांना भेट दिली.

12 वर्षांमध्ये 26 देशांना भेट

त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये तब्बल 26 देशांना भेट दिली. यासाठी येणारा खर्च भागावण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव आर्थिक स्त्रोत होता ते म्हणजे त्यांचे चहाचे दुकान. मात्र म्हणतातना आवड असली की सवड सापडते हे वाक्य के. आर. विजय यांच्याबाबतीमध्ये तंतोतंत लागू पडते. चाहा विकून मिळालेल्या पैशांमधून त्यांनी तब्बल 26 देशांना भेट दिली. त्यासाठी त्यांना वेळप्रसंगी कर्ज देखील घ्यावे लागले. विजयन यांच्या पर्यटन वेडाची चर्च देशभर होऊ लागली. यातूनच त्यांना पर्यटनासाठी आवश्यक असणारा निधी देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. सोशल मीडियावरून या जोडप्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी देखील त्यांना मदत केली. आनंद महिंद्रा यांनी त्यांची ऑस्ट्रेलियाची ट्रीप प्रयोजित केली होती. त्यासाठी आलेला सर्व खर्च महिंद्रा यांनी दिला.

शेवटचा दौरा 2019 मध्ये

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट आहे, कोरोनामुळे त्यांच्या फिरण्यावर देखील बंधने आली होती. त्यामुळे ते सध्या घरीच होते. त्यांनी आपला शेवटचा विदेश दौरा 2019 मध्ये केला होता. 2019 मध्ये ते रशियाला गेले होते. रशियामध्ये त्यांना पुतीन यांना भेटण्याची इच्छा होती, मात्र काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. अखेर वयाच्या 71 व्या वर्षी विजयन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मोहना, दोन मुली शशिकला, उषा व तीन नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित बातम्या 

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची सेंच्यूरी नक्की, संजय राऊतांचा दावा; कंगना आणि विक्रम गोखलेंना जोरदार टोला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI