कोरोनामुळे मृत्यू आणि उघडकीस आला 6 कोटींचा घोटाळा, नामांकित 15 बँकेतील अधिकारी पोलिसांच्या रडारवर

या व्यक्तीने नागरिकांना तब्बल 6 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं त्याच्या मृत्यूनंतर समोर आलं आहे.

कोरोनामुळे मृत्यू आणि उघडकीस आला 6 कोटींचा घोटाळा, नामांकित 15 बँकेतील अधिकारी पोलिसांच्या रडारवर
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 1:18 PM

कल्याण : कोरोनामुळे कल्याणमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला (Kalyan 6 Crore Fraud). या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्यक्तीने नागरिकांना तब्बल 6 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं त्याच्या मृत्यूनंतर समोर आलं आहे. एका व्यक्तीच्या नावावर दहा बँकेत कर्ज काढले गेले. समोरचा व्यक्ती व्याज घेऊन खूश होता. मात्र, जेव्हा बँकेचे हप्ते बंद झाले. तेव्हा समजले की, सर्वसामान्य माणूस फुकटात पैसे मिळतात, या लालसेपोटी कसा जाळ्यात अडकू शकतो, ही बाब उघड झाली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. आता नामांकित 15 बँकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे (Kalyan 6 Crore Fraud).

2 जुलै 2020 रोजी संकल्प फायनान्सचे मालक प्रशांत महादेव कांबळी यांचा मृत्यू झाला. प्रशांत यांनी काही जणांना बँकेतून कर्ज काढून दिले होते. लोकांना गरजेपेक्षा 10 ते 20 पटीने जास्त कर्ज काढून दिले. जितकी गरज असायची तेवढी रक्कम लोकांना देऊन उर्वरीत रक्कम आपल्या कंपनीत गुंतवित होते. जे लोक कर्ज काढत होते. त्यांना इतकाच आनंद होता की, हप्ता हा प्रशांत कांबळी भरत होते.

जितक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे, त्यावर एक टक्का व्याजही कजर्दारांनी मिळत होते. त्यानंतर आता प्रशांत यांच्या मृत्यू झाला. कजर्दारांना विविध बँकेतून फोन सुरु झाले. तुमच्या कर्जाचा हप्ता भरता याची विचारणा केली जात होती. हफ्त्याची रक्कम ऐकून कर्जदार हवालदिल झाले. कारण, त्यांचा इतका मोठा हप्ता भरला जात होता. याविषयी त्यांना काही कल्पनाच नव्हती. याप्रकरणी आता काही लोक समोर आले. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अक्षय माने यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात धक्कादायक खुलासे सुरु झाले आहेत. प्रशांत कांबळी हा व्यक्ती राहायला बदलापूरला होता. ज्या व्यक्तींना कर्जाची गरज होती. त्यांनी संपर्क साधून त्या व्यक्तीला गरजेची रक्कम काढून द्यायचा. फक्त आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करुन त्या व्यक्तीच्या नावावर नामांकित बँकेतून कर्ज काढायचा (Kalyan 6 Crore Fraud).

अक्षय माने यांना पाच लाखाची गरज असताना त्यांच्या नावार 45 लाखाचे कर्ज काढले गेले. त्यांच्या पत्नीच्या नावावर 24 लाख रुपयांचे कर्ज काढले गेले. त्यांचा एक महिन्याचा कर्जाचा हप्ता 1 लाख 17 हजार रुपये होता. अक्षयला महिन्याला 45 हजार रुपये पगार आहे. तर ते 1 लाख 17 हजार रुपायांचा कर्जाचा हप्ता भरणार कुठून, असा प्रश्न आता त्यांना पडला आहे.

ज्यावेळी कर्जाचे व्याज मिळत होते. त्यावेळी ठिक होते. आता प्रशांत यांचा मृत्यू झाल्यावर अक्षयसारखे आणखी 39 जण आहेत ज्यांच्यावर 6 कोटी रुपयाचे कर्ज आहे. या प्रकरणी प्रशांतसोबत काम करणाऱ्या हेमलता कांबळी, सुप्रिया शेरेकर, तन्मय देशमुख, वृषाली पवार, अभिजीत गुरव, राहूल कोळगे आणि मितेश कांबळे या सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नामांकित 15 बँकामधून आधार आणि पॅनकार्डवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिले कसे, असा प्रश्न आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचे संगनमत आहे. याची चौकशी आता पोलीस करणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील 4 कोटी रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Kalyan 6 Crore Fraud

संबंधित बातम्या :

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक

विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला, प्रियकराला 24 तासात अटक

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.