विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला, प्रियकराला 24 तासात अटक

कोल्हापुरात विवाहितेची प्रियकराकडून गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे ही घटना घडली.

विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला, प्रियकराला 24 तासात अटक
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 10:28 AM

कोल्हापूर : कोल्हापुरात विवाहितेची प्रियकराकडून गळा आवळून हत्या करण्यात आली आहे (Married Woman Murder). पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे ही घटना घडली. कोडोली पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावला आहे (Married Woman Murder).

सविता पाटील या महिलेचा मृतदेह घरा शेजारील विहिरीत आढळून आला होता. ही आत्महत्या आहे की त्यांची हत्या झाली आहे या संभ्रमात पोलीस आणि नातेवाईक होते. पण, कोडोली पोलिसांनी केवळ 24 तासातच या हत्येचा छडा लावत या महिलेचा प्रियकर नागेश पाटीलला (वय 33) अटक केली आहे.

आवळी गावातील सविता संजय पाटील ही महिला रविवार 1 नोव्हेंबरला सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मात्र, रात्रीपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. ती कुठेही सापडली नसल्याने तिचे पती संजय गणपती पाटील यांनी कोडोली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर बुधवारी 4 नोव्हेंबरला सकाळी घरासमोरील विहिरीत या महिलेचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कोडोली उपरुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अहवालानुसार सविताची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे पती संजय पाटील याच्यासह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासात सविताचा प्रियकर नागेश याचं नाव समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी नागेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानेच सविताची गळा आवळून हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर तिला विहिरीत टाकल्याचंही त्याने सांगितलं (Married Woman Murder).

सविताचे गावातील नागेश याच्यासोबत गेल्या 9 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. सविताचे आणखी दोघांशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन नागेशने हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले.

या प्रकरणात आत्महत्या की खून हे मोठे आव्हान कोडोली पोलिसांसमोर होते. परंतू वैद्यकीय अहवालानंतर अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावण्यात आणि आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

मृत सविताच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. आईविना मुलं पोरकी झाल्याने आवळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Married Woman Murder

संबंधित बातम्या :

गोंदियामध्ये 45 सेकंदांत 10 लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबईच्या कोव्हिड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग, सुरक्षारक्षकाला एक दिवस पोलीस कोठडी

आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, नंतर चाकूने वार, जळगावात माजी महापौराच्या मुलाची निर्घृण हत्या

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.