AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला नवी मुंबईत अटक करण्यात आली

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:36 PM
Share

नवी मुंबई : स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक (Navi Mumbai Fraud) नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला नवी मुंबईत अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती नागरिकांचे जवळपास 20 लाख रुपये घेवून फरार झाला होता (Navi Mumbai Fraud).

पनवेलसह नवी मुंबई परिसरात विविध गृहप्रकल्पात स्वस्तात घरे, बंगले देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 19 लाख 63 हजार रुपये रोख रक्कम घेवून पसार झालेल्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने अटक केली आहे.

अश्‍विनी आर कंन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा. रोहन रमेश आर्तेने तालुक्यातील नेरे या ठिकाणी व्टीन बंगले स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून सुमारे 25 पेक्षा अधिक सर्वसामान्य नागरिकांकडून बुकिंगसाठी 19 लाख 63 हजार रुपये घेवून त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या लोकांना समजताच त्यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-2 नवी मुंबईच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी. शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि सहपोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला.

त्याअंतर्गत रोहन रमेश आर्तेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.

Navi Mumbai Fraud

संबंधित बातम्या :

गोंदियामध्ये 45 सेकंदांत 10 लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.