AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांचा मोदींना सवाल

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना केलाय.

अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांचा मोदींना सवाल
| Updated on: Dec 13, 2020 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा अंतर्गत नव्या संसद भवनाची निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजनही नुकतच पार पडलं आहे. मात्र, या प्रकल्पावरुन आता राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. कारण, प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधि मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसद भवनाच्या नव्या इमारतीवरुन प्रश्न विचारला आहे. (Kamal Hasan questions to PM Narendra Modi on new parliament)

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना केलाय. 2021 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला कमल हसन यांनी सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसद भवनाच्या मुद्द्यावरुन कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.

‘देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी एवढ्या मोठ्या रकमेच्या प्रकल्पाची गरज काय? कोरोनामुळे देशातील अर्धी जनता उपाशी आहे. लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, मग 1 हजार कोटींचं संसद भवन कशाला?’, असा सवाल कमल हसन यांनी विचारला आहे.

त्याचबरोबर ‘जेव्हा चीनची भिंत बांधली जात होती. तेव्हा हजारो लोकांचे प्राण गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी ही भिंत लोकांच्या सुरक्षेसाठी असल्याचं सांगितलं. मग कुणाच्या सुरक्षेसाठी आपण 1 हजार कोटी रुपये खर्च करुन नव्या संसदेची निर्मिती करत आहात? माननीय पंतप्रधानांनी याचं उत्तर द्यावं’, असं आव्हानच कमल हसन यांनी दिलं आहे.

नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये

1. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे

2. संसदभवन स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण

3. संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च

4. केंद्रीय सचिवालय 2024 पर्यंत तयार होणार

5. लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी

6. 64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसदभवन

7. बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागिर

9. एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता

10. लोकसभेत 888 व राज्यसभेत 384 खासदार बसू शकणार

11. नव्या संसदेत सध्यापेक्षा 488 जादा खासदार बसू शकणार

12. नव्या संसदभवन परिसरात प्रत्येक खासदाराचे कार्यालय

सेंट्रल विस्ताची वैशिष्ठ्ये

1. एकूण बांधकाम 18.37 स्क्वे.कि.मी. भागात

2. सेंट्रल विस्ता प्रोजेक्टचा एकूण खर्च 11,794 कोटी रुपये

3. किमान 6 वर्षे काम चालत राहील

4. सेंट्रल विस्ताममध्ये एकूण 14 इमारती असतील

संबंधित बातम्या:

तब्बल 6 एकरांमध्ये विस्तार, जाणून घ्या सध्याच्या संसद भवनाचा खास इतिहास

New Parliament | ‘ही’ भारतीय कंपनी नव्या संसदेचा निर्माण करणार, 7 कंपन्यांना मागे सारत मिळवलं कंत्राट

Kamal Hasan questions to PM Narendra Modi on new parliament

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.