कमला हॅरिस यांचा पावसातील डान्सचा व्हिडीओ वायरल, ट्विटरवरही प्रतिक्रियांचा पाऊस

फ्लोरिडा येथील प्रचारसभेत कमला हॅरिस भर पावसात डान्स केला. हॅरिस यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हॅरिस यांच्या व्हिडीओला पसंती दिली आहे. (Kamala Harris dance video viral on  social media)

कमला हॅरिस यांचा पावसातील डान्सचा व्हिडीओ वायरल, ट्विटरवरही प्रतिक्रियांचा पाऊस

नवी दिल्ली : अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस सुरुवातीपासून चर्चेत राहिल्या आहेत. कमला हॅरिस डेमोक्रेटिक पक्षाकडून रिंगणात आहेत. फ्लोरिडा येथील प्रचारसभेत कमला हॅरिस भर पावसात डान्स केला. हॅरिस यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हॅरिस यांच्या व्हिडीओला पसंती दिली आहे. (Kamala Harris dance video viral on  social media)

पावसात भिजतनाचा फोटोदेखील हॅरिस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. पाऊस असो की उन लोकशाही कुणासाठी थांबत नाही, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. इंटरनेटवर वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सभेतील उपस्थित लोक हॅरिस यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हॅरिस यांच्या व्हीडीओला पसंती दिली आहे.

कमला हॅरिस यांच्या प्रचाराच्या टीममधील दोन व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी प्रचार थांबवला होता. त्यांनंतर हॅरिस यांच्याकडून ऑनलाईन प्रचार करण्यात येत होता. सोमवारपासून कमला हॅरिस यांनी पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात केली आहे. ऑरलँडो आणि जॅक्सनविलेमध्ये त्यांनी सुरुवात केली.

दरम्यान, कमला हॅरिस यांची पुतणी मिना हॅरिसकडून नुकताच एक फोटो ट्विट करण्यात आला होता. यावरुन अमेरिकेतील हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. या फोटोत कमला हॅरिस यांना दुर्गा मातेच्या (Durga Maa) रूपात, बायडन यांना सिंहाच्या रूपात, तर ट्रम्प यांना महिषासुराच्या रूपात दाखवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद

बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार

(Kamala Harris dance video viral on  social media)

Published On - 3:45 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI