Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देत कंगना मुंबईला येत आहे.

Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. (Kangana Ranaut Bandra Office demolished by BMC)

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.

“मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्वीट कंगनाने केले.

पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले.

नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

(Kangana Ranaut Bandra Office demolished by BMC)

मुंबई महापालिकेचे कंगनाच्या वकिलांना उत्तर

कंगना मुंबईला

मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देत कंगना मुंबईला येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कंगनाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. मंडीहून चंदीगढला जाताना कंगनाने हमिरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात थांबून दर्शन घेतलं.

चंदीगढहून मुंबईला येण्यासाठी दुपारी 12.15 वाजता ती फ्लाईट पकडणार आहे, हे विमान दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत उतरेल. कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. त्यामुळे सीआरपीएफ जवानांचे पथक तिच्या सुरक्षेत असेल.

ड्रग्जचा आरोप ते हक्कभंग

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला जात आहे. तर कंगनाविरोधात विधिमंडळ सभागृहात  हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला

केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

(Kangana Ranaut Bandra Office demolished by BMC)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI