रणवीर, रणबीर, विकी आणि अयानने ड्रग्ज टेस्टमध्ये निर्दोषत्व सिद्ध करावे, कंगनाचे चॅलेंज

रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्ट तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्याची विनंती अभिनेत्री कंगना रनौत केली आहे

रणवीर, रणबीर, विकी आणि अयानने ड्रग्ज टेस्टमध्ये निर्दोषत्व सिद्ध करावे, कंगनाचे चॅलेंज

मुंबई : बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन असल्याचा दावा करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिने थेट आघाडीच्या चार कलाकारांना आव्हान दिले आहे. अभिनेता रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट देऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज कंगनाने दिले आहे. (Kangana Ranaut challenges Ranveer Singh Ranbir Kapoor Ayan Mukerji Vicky Kaushal for drug test)

“रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्ट तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्याची मी विनंती करते, ते कोकेनचे व्यसनी असल्याच्या अफवा आहेत. त्यांना हा अफवांचा बुडबुडा फोडावा, अशी माझी इच्छा आहे. जर हे युवा कलाकार निर्दोष सिद्ध झाले, तर लाखो व्यक्तींना प्रेरणा देऊ शकतील” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यापूर्वी सर्व चित्रपट कलाकारांची रक्त तपासणी व्हावी, अशी कंगनाची मागणी असल्याचे ट्वीट लेखक अश्वनी महाजन यांनी केले होते. ते रिट्वीट करत कंगनाने चौघांना आव्हान दिले.

विशेष म्हणजे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना “99 टक्के सुपरस्टार्स हार्ड ड्रग्सच्या संपर्कात आले आहेत, मी याची हमी देते” असा दावा केला आहे.

(Kangana Ranaut challenges Ranveer Singh Ranbir Kapoor Ayan Mukerji Vicky Kaushal for drug test)

आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे कालच मुंबई पोलिसांशी ट्विटरवर वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

“जेव्हा गुंडगिरी आणि माझ्याविरुद्ध गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे मुंबई पोलिस आयुक्त अशाप्रकारे मला उघडपणे धमकावतात, तेव्हा मी मुंबईत सुरक्षित असेन का? माझ्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्नही कंगनाने विचारला.

“मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास उत्सुक आहे पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे. मी फक्त माझे करिअरच नव्हे तर माझा जीवही धोक्यात घातला आहे, हे स्पष्ट आहे की सुशांतला काही गलिच्छ रहस्ये माहित होती, म्हणूनच तो मारला गेला.” असे ट्वीट कंगनाने आठ दिवसांपूर्वी केले होते.

“अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी त्यानंतर विचारला होता.

हेही वाचा :

‘आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवू नका’, अभिनेत्री विद्या बालन रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ

प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा

मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना

कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम

(Kangana Ranaut challenges Ranveer Singh Ranbir Kapoor Ayan Mukerji Vicky Kaushal for drug test)

Published On - 1:44 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI