KBC 11 | जेव्हा अमिताभ बच्चन वयाने लहान स्पर्धकाच्या पाया पडतात…

'अनाथांची माय' असलेल्या सिंधूताई सपकाळ कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर या भागात सहभागी झाल्या, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे पदस्पर्श केले

KBC 11 | जेव्हा अमिताभ बच्चन वयाने लहान स्पर्धकाच्या पाया पडतात...
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 11:24 AM

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना भेटण्यासाठी अनेक जण ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC 11) या गेम शोची वाट निवडतात. बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या बिग बींना प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेक जण आतुर असतात. कधी कोणी बच्चन यांना मिठी मारुन प्रेम व्यक्त करतं, तर कोणी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आपल्या भावना व्यक्त करतं. मात्र केबीसी 11 मधल्या एका भागात चक्क बिग बी स्पर्धकाच्या पाया पडले.

ही स्पर्धक कोणी साधीसुधी असामी नसून ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) आहेत. देशभरातील 1200 लेकरांचं पालकत्व स्वीकारलेल्या समाजसेविका सिंधूताई सपकाळ कौन बनेगा करोडपतीच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’मधून हॉटसीटवर विराजमान होण्यासाठी निवड झालेले स्पर्धक धावत बिग बींच्या दिशेने येतात आणि उत्स्फूर्तपणे पाया पडतात, हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. वयस्कर स्पर्धकाने पाया पडल्यास अमिताभ बच्चन संकोचून त्यांना विनम्रपणे थांबवतातही.

सिंधूताई जेव्हा खेळात सहभागी होण्यासाठी सेटवर आल्या, तेव्हा त्यांचे पदस्पर्श करण्यापासून बिग बी स्वतःला थांबवू शकले नाहीत. वयाने लहान असल्या, तरी सिंधूताईंचं कर्तृत्व पाहून अमिताभ बच्चन यांना पाया पडावंसं वाटलं असेल, यात शंका नाही.

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सिंधूताई पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सिंधूताई मराठीतून जीवनाचं सार सांगताना ऐकायला मिळतात.

तुम्ही नेहमी गुलाबी रंगाची साडी का नेसता? असा प्रश्न बिग बींनी सिंधूताईंना विचारला. त्यावर ‘जीवनात इतका काळा रंग पाहिला, आता तरी गुलाबी रंग पाहू दे’ असं उत्तर सिंधूताईंनी हसतमुखाने दिलं. कोणी तुमच्यासोबत वाईट वागलं, तरी तुम्ही वाईट वाटून घेत नाही, हे धैर्य कुठून आलं? या बच्चन यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सिंधूताईंनी आपल्या नवऱ्याने दिलेल्या हालअपेष्टांमुळे आपण हा टप्पा गाठल्याचं सांगितलं.

कौन बनेगा करोडपतीच्या आधीच्या सिझनमध्ये प्रकाश आमटे आणि मंदा आमटे हे सामाजिक कार्यकर्ते असलेलं आमटे दाम्पत्य ‘कर्मवीर’ या विशेष भागात सहभागी झालं होतं.

Non Stop LIVE Update
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.