लाज वाटायला हवी आपल्याला, पुण्यातील आजींच्या व्हिडीओवरुन केदार शिंदेंचा संताप

शांताबाई पवार या 85 वर्षीय आजींना मदतीसाठी पुढे येणारे लोक मदतीचे व्हिडीओ बनवत आहेत. तर काहीजण शांताबाईंना पुन्हा कसरती करुन दाखवायला लावत आहेत, या गोष्टीचा केदार शिंदे यांना राग आला आहे. (Kedar Shinde angry).

लाज वाटायला हवी आपल्याला, पुण्यातील आजींच्या व्हिडीओवरुन केदार शिंदेंचा संताप
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 4:15 PM

मुंबई : लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या 85 वर्षीय आजीबाई शांताबाई पवार यांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते आणि नेतेमंडळी पुढे येत आहेत (Kedar Shinde angry). मात्र, मदत करण्यासाठी आलेले काहीजण आजीबाईंना परत कसरत करुन दाखवा, असा आग्रह करत आहेत. तर काहीजण मदतीचे व्हिडीओ काढत आहेत. याच गोष्टीचा दिग्दर्शक केदार शिंदे यांना राग आला आहे. त्यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे (Kedar Shinde angry).

“शांताबाई पवार आजींचा व्हिडीओ गाजतोय. चहूबाजूंनी मदत जाहीर होत आहे. काहीतर लागलीच पोहोचून मदत करत आहेत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडीओ काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करुन दाखवायला लावणं, किती संयुक्तिक आहे? आपल्याला लाज वाटायला हवी”, असा घणाघात केदार शिंदे यांनी केला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

शांताबाई पवार नेमक्या कोण?

वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.

उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजी सांगतात.

हेही वाचा : मर्दानी आजीला 1 लाख आणि साडीचोळी, गृहमंत्री अनिल देशमुख थेट दारात

शांताबाई पवार यांनी ढालपट्टा आणि बाटलीवर तोल सांभाळतानाचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. “काही वर्षांपूर्वी तारेवर चालताना पाय मोडला होता, तर बाटलीवर तोल सांभाळताना पडून हाताला दुखापत झालेली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली, हात अजूनही दुखतो, तरीही जिद्दीने हे खेळ अजूनही खेळते आणि पोटाची खळगी भरते” असे आजी म्हणाल्या. कठीण काळात मदतीचे अनेक हात पुढे आले. कधी सत्कार झाला, तर कधी आर्थिक हातभार मिळाला, असेही आजी आवर्जून सांगतात.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (25 जुलै) शांताबाईंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख रुपये आणि नऊवारी साडी भेट देत शांताबाईंचा सन्मान केला. तसेच शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिलं.

संबंधित बातम्या  : 

Shantabai Pawar | पुण्यातील आजीबाईंचा लाठ्याकाठ्यांचा खेळ, रितेशही म्हणाला ‘लय भारी’

Shantabai Pawar | आठव्या वर्षी ढालपट्टा सुरु, ‘सीता और गीता’मध्ये काम, पुण्यातील 85 वर्षांच्या शांताबाईंचा प्रेरणादायी प्रवास

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.