AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : केरळमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण, भारतात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ

केरळमध्ये आतापर्यंत 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Kerala Corona Virus One Positive) आहेत. यात तीन वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

Corona Virus : केरळमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण, भारतात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ
| Updated on: Mar 09, 2020 | 12:24 PM
Share

तिरुअनंतपुरम (केरळ) : कोरोना व्हायरसने जगात धुमाकूळ घातला (Kerala Corona Virus One Positive) आहे. कोरोना व्हायरसची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नुकतंच भारतात एका 3 वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. केरळमध्ये एका 3 वर्षीय मुलामध्ये कोरोना व्हायरसची लक्षण आढळली आहे. नुकतंच तो त्याच्या परिवारासोबत इटलीहून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर ही घटना समोर आली. त्यामुळे भारतात कोरोना व्हायरस संशंयित रुग्णांची संख्या 43 झाली आहे.

केरळमध्ये आतापर्यंत 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Kerala Corona Virus One Positive) आहेत. त्यात या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यात तीन वर्षीय मुलाचाही समावेश आहे. या मुलगा त्याच्या कुटुंबांसह 7 मार्चला इटलीहून केरळला आला. केरळच्या विमानतळावरील थर्मल स्क्रीनिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनाचा वाढता कहर, माणसांपाठोपाठ आता पाळीव कुत्र्यालाही लागण

या कुटुंबाला कोच्चीच्या एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण कुटुंबाला वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान त्याच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झालेली नाही. फक्त 3 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

केरळमध्ये 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

काल (7 मार्च) केरळमध्ये कोरोना व्हायरची पाच जणांना लागण झाल्याचं समोर आलं होतं. या 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या सर्वांना पथानामथिट्टाच्या रुग्णालयात ठेवले आहे. हे पाच जण इटलीहून केरळला आले आहेत. ज्यामुळे पथानामथिट्टा जिल्ह्यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाच्या रुग्णाला गोळ्या घाला, किम जोंग यांचं फर्मान?

दरम्यान भारतात आतापर्यंत सर्वाधिक 43 कोरोना संशंयित रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. यापूर्वी केरळमध्ये कोरोनाचे 3 संशंयित रुग्ण आढळले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करुन सोडण्यात आले होते. हे संशयित रुग्ण आढळल्यानंतर भारतात कोरोनाबद्दल अलर्ट वाढवला होता. जगभरातून भारतात येणाऱ्या लोकांची विमानतळावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे.

 इटलीमध्ये 133 लोकांचा मृत्यू

जगभरात 70 हून अधिक देशात कोरोना व्हायरस पसरला आहे. सोमवारी (9 मार्च) फक्त एकट्या चीनमध्ये 3 हजार 119 जणांचा मृत्यू झाला. तर चीनव्यतिरिक्त इटली आणि इराणमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात इटलीमध्ये 133 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये 29 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला  (Kerala Corona Virus One Positive) आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.