AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमडेसिवीर आणि मॉलनुपिराविरमध्ये नेमका फरक काय? कोरोनाची लागण झाल्यास या औषधांच्या सेवनाचा का दिला जातो सल्ला 

जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली होती तेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली होती आणि यंदा मॉलनुपिराविरची चर्चा जोर धरत आहे. या मॉलनुपिराविरलाच कोरोनाचे औषध म्हणून मान्यता मिळत आहे. आपन आज रेमडेसिवीर आणि मॉलनुपिराविर यामधील फरक जाणून घेणार आहोत.

रेमडेसिवीर आणि मॉलनुपिराविरमध्ये नेमका फरक काय? कोरोनाची लागण झाल्यास या औषधांच्या सेवनाचा का दिला जातो सल्ला 
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 6:29 PM
Share

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या  केस दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहे, समोर येणारी आकडेवाडी प्रत्येकाला चिंतेत टाकत आहे. भारतामध्ये आता प्रत्येक दिवशी 2 लाखांपेक्षा अधिक लोक कोरोना (Coronavirus Cases) ने बाधित होत आहेत. पुन्हा एकदा पहिल्यासारखे या रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान एक औषध मॉलनुपिराविर (Molnupiravir) हे औषध सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. हे तेच औषध आहे ज्याला कोरोनाचे पहिले औषध म्हणून संबोधले गेले होते, त्याप्रमाणे गेल्या वेळेस म्हणजेच दुसर्‍या लाटेच्या वेळी रेमडेसिवीर या औषधाच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र यावेळी मॉलनुपिराविर या औषधाची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे, मात्र डॉक्टरांच्या मते हे औषध सर्वच कोरोनाबाधितांना देण्याची आवश्यकता नाही. अशावेळी जाणून घेऊया की, मॉलनुपिराविर हे औषध नेमके काय आहे आणि कशाप्रकारे आपल्या शरीरावर या औषधाचा प्रभाव पाहायला मिळतो. यासोबत डॉक्टरांचे नेमके या औषधाबद्दल काय मत आहे? हे औषध प्रत्येकाला देणे गरजेचे आहे का? अशा विविध प्रश्नांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

हे औषध नेमके काय आहे आणि कसे प्रभावी ठरते?

खरेतर या औषधालाच कोरोनाचे औषध म्हटले जात आहे. या औषधांचा पूर्ण पाच दिवसांचा एक विशिष्ट असा कोर्स आहे आणि या पाच दिवसांचा कोर्स प्रत्येक कोरोना बाधित असलेल्या रुग्णाला करणे अत्यंत गरजेचे आहे. आपणास सांगू इच्छितो की, हे औषध एक अँटिव्हायरल ड्रग आहे. या औषधाला फ्लू म्हणजेच इंफ्लुएंजा या आजारावर उपचार करण्याकरीता या औषधाची निर्मिती करण्यात आली होती. हे एक ओरल ड्रग आहे म्हणजेच या औषधाचे आपण सेवन करू शकतो. आता आपण हे औषध किती प्रभावी आहे याबद्दलची काही संक्षिप्त स्वरुपातील माहिती सुद्धा तज्ञ मंडळीकडून जाणून घेणार आहोत. कारण की अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की या औषधाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

औषधाचे नेमके काम

मॉलनुपिराविर  हे औषध व्हायरसला आपल्या शरीरामध्ये वाढू देत नाही. जेव्हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये पोहोचतो तेव्हा तो आपला जिनोम रेपलिकेट करतो याच्या सहाय्याने व्हायरस आपली संख्या वाढवतो परंतु जेव्हा हे औषध शरीरामध्ये दिले जाते तेव्हा ते कोरोनाने संक्रमित झालेल्या पेशींना ऑब्‍जॉर्ब करून घेते. या औषधाच्या कारणामुळे संक्रमित झालेल्या पेशीमध्ये एक बिघाड निर्माण होतो आणि हे औषध सेवन केल्यामुळे शरीरामध्ये पुन्हा व्हायरसची संख्या सुद्धा वाढत नाही म्हणूनच या औषधाचे कार्य आपल्या शरीरातील व्हायरसचे नियंत्रण करणे हेच आहे.

तज्ज्ञ मंडळी  काय म्हणतात?

या औषधांच्या वापराबद्दल एम्सचे आरोग्य विशेषज्ञ डॉक्टर पीयूष रंजन यांनी आकाशवाणीसोबत बोलताना सांगितले की, जसे की गेल्यावेळी रेमडेसिवीरचे नाव खूप चर्चेत होते तसेच यावेळी मॉलनुपिराविरचे नाव चर्चेत आहे. 100 पैकी 99 लोक 3 ते 4 दिवसांत स्वत:च या आजारातून पूर्णपणे बरे होणार आहेत, अशा वेळी संबंधित रुग्णांना हे औषध दिले जाते. ते ऑलरेडी बरे होणार असतात मात्र या औषधांमुळेच ते बरे झाल्याचा दावा केला जातो.

डॉक्टरांच्या मते ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की या औषधाद्वारे आतापर्यंत जे काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला गेलेला आहे त्यात आतापर्यंत कोणतीही प्रोटेक्टिव्ह किंवा इफेक्टिव परिणाम पाहिले गेले नाहीत. सुरक्षेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा यात होत्या ज्याला आईसीएमआर ने अद्यापही लाल झेंडाच दाखवलेला होता म्हणजे अद्यापही सहमती दर्शवली नाही. तसेच अनेक बाजूंनी अशा बातम्या सुद्धा येत आहे की या औषधाचे सेवन केल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत नाही आहे. परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या या आजारपणात एक टक्‍क्‍यापेक्षा कमी झालेली आहे. डॉक्टर रंजन यांचे म्हणणे असे आहे की, गेल्या वर्षी डेल्टाच्या वेळी 100 संक्रमित लोकांपैकी 20 लोक असे होते की, ज्यांच्यात गंभीर लक्षणे होती आणि 10 लोक असे होते की त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे गरजेचे होते. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये  शंभर पैकी  1 पेक्षा ही कमी म्हणजेच 200पैकी एखाद्या व्यक्तीलाच गंभीर स्वरूपाचे लक्षण आढळलेले पाहायला मिळत आहे.

औषध कंपनीचा दावा

हे औषध बनवणारी कंपनी म्हणजेच अमेरिकी फार्मा कंपनी मर्क यांचे म्हणणे आहे की मॉलनुपिराविर झालेले क्लिनिकल आणि प्रि क्लिनिकल ट्रायलनुसार ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यातून असे दिसते की, हे औषध कोरोनाच्या अनेक व्हेरिएंटवर प्रभावी औषध आहे. या व्हेरिएंटमध्ये   डेल्टा ,गामा आणि म्यू यांचा सुद्धा समावेश आहे. आपणास सांगू इच्छितो की, या औषधाचा प्रयोग कोव्हिड रुग्णांवर करण्यात आला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये ज्या काही रुग्णांवर ट्रायल घेण्यात आलेल्या होत्या त्यातून एक गोष्ट समोर आली की ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले नव्हते त्यांच्यातील 14 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते आणि त्यांचा मृत्यू सुद्धा झाला होता, तसेच ज्या रुग्णांना मॉलनुपिराविर हे औषध दिले गेले होते त्यांच्यातील 7.3% रुग्णांसोबतच ही घटना घडली होती .

संबंधित बातम्या 

मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?

हृतिक रोशनची पूर्व पत्नीसोबत सुझेन खानसोबत प्रेमसंबंध?, अर्सलान म्हणाला, ‘मी तिच्याशी प्रेमानेच बोलणार’

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो मोठा फटका

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.