Kolhapur By Election : अखेर अभिजीत बिचुकलेंची माघार, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक, 27 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकलेंनी अखेर माघार घेतली आली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने बिचुकलेंवर अर्ज माघार घेण्याची वेळ आलीय. दरम्यान, आजारी असल्याने उमेदवारी अर्ज भरता आला नसल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी 27 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Kolhapur By Election : अखेर अभिजीत बिचुकलेंची माघार, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक, 27 उमेदवारी अर्ज दाखल
Abhijeet BichukaleImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:52 AM

कोल्हापूर :  कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकलेंनी अखेर माघार घेतली आली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने बिचुकलेंवर अर्ज माघार घेण्याची वेळ आलीय. दरम्यान, आजारी असल्याने उमेदवारी अर्ज भरता आला नसल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election) 19 उमेदवारांनी 27 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्जाची छाननी होणार असून 28 एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक होत आहे.

सत्यजीत कदम कोण आहेत?

भाजपकडून कोल्हापूर उत्तरची उमेदवारी जाहीर करण्यात आलेले सत्यजीत कदम हे कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक असून ताराराणी आघाडीचे गटनेते राहिलेले आहेत. 2010 मध्ये कदम काँग्रेसकडून कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2011 आणि 2012 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. 2015 मध्ये कोल्हापूर महापनगरपालिकेमध्ये ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून कदम यांची निवड झाली होती.

भाजप कोल्हापूरमध्ये खातं उघडणार?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आला नव्हता.त्यामुळं विरोधी पक्षांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजप खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.

आघाडीचा धोरणात्मक निर्णय

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे त्या पक्षाला आघाडीची उमेदवारी द्यायची असा धोरणात्मक निर्णय करण्यात आलाय. त्यामुळे क्षीरसागर यांची ही मागणी अमान्य झालीय.

कोण होते चंद्रकांत जाधव?

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

इतर बातम्या

Nagpur Crime | धक्कादायक! प्रेमप्रकरणातून गर्भधारणा, 12 वर्षीय मुलीचे लावले लग्न, माझ्या पतीला सोडा मुलीची हाक

राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेचे आठ प्रश्न MPSCने केले रद्द

अधिक परतावा, अधिक कमाई, इक्विटी फंडात नफ्याची मलाई; ‘या’ योजनेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.