Bachchan Pandey : ‘बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण! पाहा खिलाडी कुमार आणि क्रिती सेनॉनचा दमदार लूक..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांच्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत.

Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'चे शूटिंग पूर्ण! पाहा खिलाडी कुमार आणि क्रिती सेनॉनचा दमदार लूक..
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 5:04 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाविषयी एक बातमी समोर आली असून क्रिती सेनॉनने अक्षय कुमारसोबतचे तिचे शूटिंग पूर्ण करून घेतले आहे. क्रितीने अक्षय कुमारसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. (Kriti Sanon shared a photo with Akshay Kumar on social media)

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

हा फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले आहे की, बच्चन पांडे चित्रपटातील माझा अक्षय कुमारसोबतचा प्रवास संपला आहे. या चित्रपटाचे शेड्यूल माझ्या आयुष्यातील कमालीचे राहिले आहे. शूटिंग करतानाची मस्ती ते खेळ आणि जेवणाचा आनंद घेताना हे शूटिंग कधी संपले ते कळालेच नाही. आम्ही एक परिवार झालो होतो. चला तर मग भेटूयात आता सरळ सिनेमा घरात..

‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

सुशांत सिंह राजपूतचा केंद्र सरकार सन्मान करणार; नॅशनल अ‍ॅवार्डला सुशांतचे नाव देण्याचा विचार सुरू!

Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला…

सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…

(Kriti Sanon shared a photo with Akshay Kumar on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.