ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्यामुळे शिक्षण रथातून धडे; शहादा येथील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, यामुळे गेल्या सहा महिन्यांपेक्षाही अधिक कालावधीपासून देशभरातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.

ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्यामुळे शिक्षण रथातून धडे; शहादा येथील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, यामुळे गेल्या सहा महिन्यांपेक्षाही अधिक कालावधीपासून देशभरातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत आणि भौगालिक परिस्थितीमुळे मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. (Lessons from the education chariot due to not being able to take online education great activities of the Shahada couple)

nandurbar
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची भीती होती. यावर उपाय म्हणून शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रवींद्र पाटील आणि प्रियांका पाटील या शिक्षक दाम्पत्याने शिक्षण रथ तयार करून विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. या शिक्षण रथाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे एलएडी स्क्रिनवरून विद्यार्थिनींना डिजिटल शिक्षण दिले जाते.

शाळा आपल्या दारी…शाळा बंद…पण शिक्षण आहे. हा उपक्रम पाटील दाम्पत्याने स्वत:च्या खर्चातून तयार केला आहे. डिजिटल शिक्षण रथ बनवून आदिवासी भागातील विद्यार्थिनींना शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. पाड्यावर एखादया झाडाखाली ही शाळा भरते. डिजिटल शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही शाळा खुल्या मैदानात भरते. सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून विद्यार्थिनींना बसवले जाते. एवढेच नव्हेतर विद्यार्थिनींना मास्क आणि सॅनिटायझर देखील दिले जाते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सुरु केलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षण दिले जात आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहाच्या बाहेर जाऊ नयेत, म्हणून शिक्षकांकडून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

संबंधित बातम्या : 

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला, शाळेची आठवण येतेय, नांदेडच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

(Lessons from the education chariot due to not being able to take online education great activities of the Shahada couple)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI