LIVE : खातेवाटप लवकर जाहीर होईल- एकनाथ शिंदे
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

[svt-event title=”खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटपात काही अडचण नाही. आता जीएसटी संदर्भामध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनस्थिती मी समजू शकतो. त्यांना दुसरं काही काम नाही. यांच्या सध्या मनासारखं होत नाही पण सरकार कार्यकाळ पूर्ण करेल – जयंत पाटील ” date=”01/01/2020,4:02PM” class=”svt-cd-green” ] खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटपात काही अडचण नाही. आता जीएसटी संदर्भामध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनस्थिती मी समजू शकतो. त्यांना दुसरं काही काम नाही. यांच्या सध्या मनासारखं होत नाही पण सरकार कार्यकाळ पूर्ण करेल – जयंत पाटील [/svt-event]
[svt-event title=” खातेवाटप मोठा विषय नाही : अशोक चव्हाण” date=”01/01/2020,4:00PM” class=”svt-cd-green” ] खातेवाटप हा विषय आता मोठा विषय राहिलेला नाही. येणाऱ्या दोन दिवसात मार्ग निघेल. सकाळी झालेली बैठक ही जीएसटी संदसर्भात झाली. राज्यात महसूल कसा वाढेल यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. खाटेवाटपासंदर्भात कोणाचीही नाराजी नाही : अशोक चव्हाण [/svt-event]
[svt-event title=”खातेवाटप लवकर जाहीर होईल- एकनाथ शिंदे” date=”01/01/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ] खातेवाटप लवकर जाहीर होईल, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे – एकनाथ शिंदे [/svt-event]
[svt-event title=”संग्राम थोपटे यांचा सन्मान केला जाईल – बाळासाहेब थोरात” date=”01/01/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] संग्राम थोपटे यांच्याशी माझं रात्री बोलणं झालं, त्यांचा सन्मान केला जाईल, काँग्रेस पक्ष हे कुटुंब आहे, त्यामुळं त्या पद्धतीनं विचार केला जाईल. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं मंत्रिपदे कमी वाट्याला आली. मंत्रिपदावरुन कुठेही वाद नाही. खातेवाटप आज होईल. चर्चा करुन निर्णय घेतला जात आहे – बाळासाहेब थोरात [/svt-event]
[svt-event title=”केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नागपूर दौऱ्यावर” date=”01/01/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नागपूर दौऱ्यावर, राज्यातील सत्तानाट्यानंतर अमित शहा यांचा पहिलाच नागपूर दौरा, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेच्या इमारतीचं उद्या अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्यात बैठक होण्याची शक्यता, राज्यातील राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये होऊ शकते चर्चा [/svt-event]
[svt-event title=”घरगुती सिलेंडर 19 रुपयांनी महागला ” date=”01/01/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली – घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ, सिलेंडर 19 रुपयांनी महागला, 695 रुपयात मिळणारा सिलेंडर आता 714 रुपयांना मिळणार [/svt-event]
[svt-event title=”खातेवाटपाबाबत सामनातून संकेत ” date=”01/01/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासाठी सातत्याने केलेले काम पाहाता त्यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच पर्यावरणासोबतच आणखीही एखाद्या महत्वाच्या खात्याची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. [/svt-event]
[svt-event title=”कृषी खात्यासाठी गुलाबराव पाटील-दादा भुसे यांची नावं चर्चेत” date=”01/01/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कृषी खाते गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे यांच्यासारख्या ग्रामीण भागातील नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. [/svt-event]
[svt-event title=”भीमा कोरेगावमध्ये कडेकोट बंदोबस्त” date=”01/01/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] भीमा कोरेगाव इथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त, एकूण १० हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात, २५० वॉट्सअप ग्रुप अडमिनला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, दीडशे एकरवरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१८ च्या दंगलीत सहभागी लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बाटलीबंद पाणी विक्रीस बंदी” date=”01/01/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बाटलीबंद पाणी विक्रीस बंदी, विद्यापीठाच्या कार्यक्रमात, कॅन्टीन आणि चर्चासत्रात बाटलीबंद पाणी मिळणार नाही, पाणी पिण्यासाठी फक्त ग्लासचाच वापर करण्याचे आदेश, विद्यापीठात आजपासून निर्णयाची अंमलबजावणी, बाटलीबंद पाण्याचे बिलं लावल्यास मंजूर न करण्याचे आदेश [/svt-event]
