AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhya Pradesh by election result live :मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज, शिवराज सत्ता राखणार की कमलनाथ पुन्हा बाजी मारणार?

मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. या निकालाचे सर्व अपडेट्स तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहू शकणार आहात.

Madhya Pradesh by election result live :मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज, शिवराज सत्ता राखणार की कमलनाथ पुन्हा बाजी मारणार?
| Updated on: Nov 10, 2020 | 7:52 AM
Share

भोपाळ: मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं होतं. यावेळी त्यांच्या २२ समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कलमनाथ सरकारला पायउतार व्हावं लागलं आणि भाजप पुन्हा सत्तेत आली. आता या ठिकाणी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान सत्ता राखणार की कमलनाथ पुन्हा सत्तेवर येणार हे आज स्पष्ट होणार आहे. (Madhya Pradesh by election result 2020 today)

दरम्यान, काँग्रेस किंवा कमलनाथ यांना पुन्हा सत्तेवर येणं सहजसोपं नक्कीच नाही. कारण, मध्यप्रदेशच्या 230 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 107 तर काँग्रेसचे 87, बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्ष आमदार आहेत. मध्यप्रदेश विधानसभेची प्रभावी संख्या 229 च्या आधारावर बहुमताचा आकडे 115 आहे. अशावेळी भाजपला सत्ता राखण्यासाठी 8 जागा जिंकणे गरजेचं आहे. तर काँग्रेसला 28 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणं नक्कीच सोपं नाही. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे आणि स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होत आहे. कोरोनाच्या धर्तीवर मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या आहेत.

बिहारच्या रणसंग्रामाचा निकालही आज

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकालही आज लागणार आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची ‘कंदिल’ चमकणार की नितीश कुमार यांचा ‘बाण’ निशाण्यावर लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. तीन मतमोजणी केंद्रे ही तुलनेने जास्त असून, काही विशेष जिल्ह्यांमध्येच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व जिल्हा चंपारण (12 विधानसभा मतदारसंघ), गया (10 विधानसभा मतदारसंघ), सिवान (8 विधानसभा मतदारसंघ) आणि बेगूसराय (7 विधानसभा मतदारसंघ) अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. बिहारच्या इतर जिल्ह्यांत एक-दोन मतमोजणी केंद्रे सुरू केली आहेत.

संबंधित बातम्या:

10 राज्यांतील 54 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक, मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत मोठा ‘घोडेबाजार’?, काँग्रेस आमदाराला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

Madhya Pradesh by election result 2020 today

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.