मृत्यूनंतर तेलगी निर्दोष, स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व सुटले!

मृत्यूनंतर तेलगी निर्दोष, स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व सुटले!

नाशिक: देशभर गाजलेल्या 20 हजार कोटींच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालयाने या कथित घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीसह सर्व 7 आरोपींना निर्दोष घोषित केलं. घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा गेल्या वर्षीच मृत्यू झाला आहे. या घोटाळाप्रकरणाची सुनावणी 2003 पासून सुरु आहे. यामध्ये 49 साक्षीदारांची […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

नाशिक: देशभर गाजलेल्या 20 हजार कोटींच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालयाने या कथित घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीसह सर्व 7 आरोपींना निर्दोष घोषित केलं. घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा गेल्या वर्षीच मृत्यू झाला आहे.

या घोटाळाप्रकरणाची सुनावणी 2003 पासून सुरु आहे. यामध्ये 49 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. मात्र न्यायालयात घोटाळा सिद्ध न झाल्याने, सर्व आरोपी निर्दोष सुटले. याप्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि कर्मचारीही आरोपी होते. न्यायाधीश पी आर देशमुख यांनी हा निर्णय दिला.

तेलगी घोटाळा

अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टॅम्प देशभरात विक्री करुन त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

20 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला 2007 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 30 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तेलगीला 2001 मध्ये अजमेर इथून अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून तेलगी गेल्या वर्षीपर्यंत जेलमध्येच होता. गेल्या वर्षी त्याचा बंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें