राज्यात दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9,318 वर

राज्यात आज (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 रुग्ण नवे आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9,318 वर

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे (Maharashtra Corona Update). राज्यात आज (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे तर पुण्यातील रुग्णांची संख्या 1100 पेक्षाही जास्त झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात दिवसभरात 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 1,388 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज दिवसभरात 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईचे 25, जळगावचे 4, पुणे शहरातील 2 रुग्ण आहेत. तसेच यामध्ये 16 पुरुष तर 15 महिला आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 400 रुग्णांचा बळी गेला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनाकडून पूर्णपणे सील करण्यात येत आहे. संशयित रुग्णांना क्वारंटाईन केलं जात आहे. तसेच नवे कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण किती व्यक्तींच्या संपर्कात आले याचादेखील शोध प्रशासन घेत आहे. यामध्ये कुणी संशयित आढळलं तर त्याची तपासणी केली जात आहे आणि क्वारंटाईन केलं जात आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 29 हजार 931 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचं 9361 पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 6169 374 244
पुणे (शहर+ग्रामीण) 1102 125 79
पिंपरी चिंचवड मनपा 72 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 389 36 6
नवी मुंबई मनपा 142 3
कल्याण डोंबिवली मनपा 153 3
उल्हासनगर मनपा 3
भिवंडी निजामपूर मनपा 14
मीरा भाईंदर मनपा 123 2
पालघर 41 1 1
वसई विरार मनपा 123 3
रायगड 22 5
पनवेल मनपा 44 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 24 2
मालेगाव मनपा 171 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 25 3
जळगाव 40 1 9
नंदूरबार 11 1
सोलापूर 68 5
सातारा 32 3 2
कोल्हापूर 12 2
सांगली 27 27 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 90 14 6
जालना 2
हिंगोली 15 1
परभणी 1
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 3
अकोला 34 1 1
अमरावती 28 7
यवतमाळ 71 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 1 1
नागपूर 135 12 1
भंडारा 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 25 2
एकूण 9318 1388 400

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 1543 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

115 दिवस पुरेल इतका धान्यपुरवठा, देहविक्रीतील महिलांच्या मदतीसाठी मंत्री यशोमती ठाकूर धावल्या

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील

Published On - 12:20 am, Wed, 29 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI