लॉकडाऊनमध्ये दारु विक्री सुसाट, दोन आठवड्यात 5 लाखांहून अधिक ग्राहकांना दारुची होम डिलीव्हरी

मुंबई उपनगरात 35 हजार 513 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री (Maharashtra Liquor Shops Home Delivery order Lockdown)  करण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये दारु विक्री सुसाट, दोन आठवड्यात 5 लाखांहून अधिक ग्राहकांना दारुची होम डिलीव्हरी
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 12:02 AM

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्येही दारुची विक्री सुसाट सुरु (Maharashtra Liquor Shops Home Delivery order Lockdown) आहे. राज्यात गेल्या 15 मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे. त्यानुसार 15 मे 2020 ते 29 मे 2020 या काळात 5 लाख 52 हजार 637 ग्राहकांना घरपोच दारुविक्री करण्यात आली. तर आज दिवसभरात 58 हजार 231 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली.

यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 35 हजार 513 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री (Maharashtra Liquor Shops Home Delivery order Lockdown)  करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्यात दारुविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 7,291 अनुज्ञप्ती सुरु आहेत.

राज्य शासनाने 3 मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली. त्यानुसार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे.

1 लाखांहून अधिक ग्राहकांचे मद्य परवान्यासाठी अर्ज

राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात 1 मे ते 28 मे या काळात 1 लाख 14 हजार 224 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते. यापैकी 1 लाख 02 हजार 712 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता इच्छूक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात.

तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत.

या मद्यसेवन परवान्यासाठी एक वर्षाकरीता 100 रुपये किंवा आजीवन परवान्याकरीता 1 हजार रुपये शुल्क भरावे (Maharashtra Liquor Shops Home Delivery order Lockdown) लागतात.

संबंधित बातम्या :

गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात, सोलापुरात ग्राम पंचायतीत अधिकाऱ्यांची दारु पार्टी

बीडमध्ये पुन्हा ‘चिअर्स’! पहिल्याच दिवशी 62 हजार लिटर मद्याची विक्री

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.