‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

'या' तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 9:09 AM

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी 22 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra weather alert rain update in pune mumbai imd )

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह मुसळधार पाऊस होईल तर बुधवारीदेखील या भागांत धुवांधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तिथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तविला.

इतर बातम्या –

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

(Maharashtra weather alert rain update in pune mumbai imd )

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.