AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला

राज्यातील सरकारने लॉकडाऊन आधीच वाढवला आहे. त्यानंतर आता भारतात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला जाणार (Maharshtra lockdown extended 3 May) आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला
| Updated on: Apr 14, 2020 | 11:51 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Maharshtra lockdown extended 3 May) चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन हा तीन दिवसांनी वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी देशात जाहीर केलेल्या पहिल्या लॉकडाऊनची मुदत आज (14 एप्रिल) संपणार होती. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज देशाला संबोधित केलं.

“यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काही राज्यातील सरकारने लॉकडाऊन आधीच वाढवला आहे. त्यानंतर आता भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला जाणार आहे. म्हणजेच 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहे. या दरम्यान आपल्याला सर्व नियमांचे पूर्वीप्रमाणेच पालन करायचे आहे.

“माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे आता कोरोनाला आपल्याला नवीन परिसरात पसरु द्यायचं नाही. स्थानिक ठिकाणी आता एकही रुग्ण वाढला तर हे आपल्यासाठी चिंतेचा विषय असू शकतो. कुठेही जर एकही मृत्यू झाला तर आपली चिंता अजून वाढेल. त्यामुळे आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त सतर्कता बाळगली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“ज्या ठिकाणी हॉटस्पॉट होऊ शकतात त्यावर आपल्याला करडी नजर ठेवावी लागेल त्या ठिकाणी कठोर पावलं उचलावी लागतील. नवीन हॉटस्पॉट बनणे हे आपल्या तपस्येला अजून जास्त चॅलेंज देईल. नवीन संकट निर्माण होईल,” असेही मोदींनी यावेळी (Maharshtra lockdown extended 3 May) सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे, एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य निभावत आहात
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला नागरिकांनी संयम दाखवत खरी श्रद्धांजली दिली
  • अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात
  • भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेशी नागरिकांचे स्क्रीनिंग सुरु केले, शंभर केस होण्याआधीच परदेशी सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पाहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला
  • इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे
  • भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही
  • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मोलाचं कार्य, कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्याने आर्थिक तज्ज्ञही अवाक, लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा उपाय वारंवार समोर येत आहे
  • भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे 
  • पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं
  • 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू
  • सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न
  • कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाल्यावर 1500-1600 बेड्स असावे, असा जागतिक अनुभव, आपल्याकडे 2 लाख बेड्स आणि 600 कोविड रुग्णालये
  • युवा वैज्ञानिकांनो पुढे या, कोरोनावर लस शोधा.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.