भाऊंवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो; एकनाथ खडसेंच्या पत्नीचा टोला

नाथाभाऊंवर ज्या लोकांनी अन्याय केला त्यांनीच अन्याय का केला सांगावं, असं सांगतानाच भाऊंवर अन्याय करणाऱ्यांना देव सदबुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया मंदाताई खडसे यांनी व्यक्त केली.

भाऊंवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो; एकनाथ खडसेंच्या पत्नीचा टोला
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 5:29 PM

जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यावर खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाथाभाऊंवर ज्या लोकांनी अन्याय केला त्यांनीच अन्याय का केला सांगावं, असं सांगतानाच भाऊंवर अन्याय करणाऱ्यांना देव सुबुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया मंदाताई खडसे यांनी व्यक्त केली. (mandatai khadse first reaction on eknath khadses ncp joining)

टीव्ही9 मराठीशी बोलताना मंदाताई खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. नाथाभाऊंवर काही लोकांनी अन्याय केला. त्यांनी अन्याय केला नसता तर आज ही वेळच आली नसती, असं मंदाताई म्हणाल्या. दसऱ्याला सीमोल्लंघन करतात. खडसेंनी आधीच राष्ट्रवादीत प्रवेश करून हे सीमोल्लंघन केलं आहे. नाथाभाऊंनी महाराष्ट्रावर प्रेम केलं आणि जनतेनेही त्यांना प्रेम दिलं. मुक्ताईचे आशीर्वाद त्यांना लाभले आहेत, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे काल जळगावात पोहोचले. त्यानंतर ते आज पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मूळगावी कोथळीत पोहोचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नाथाभाऊ जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर नाथाभाऊंना गुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत करत खडसे यांनी त्यांच्या घराकडे मार्गक्रमण केलं. दारात येताच रक्षा खडसे आणि मंदाकिनी खडसे यांनी खडसे यांचं औक्षण करत त्यांचं घरात स्वागत केलं. खडसे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर खडसेंच्या निवासस्थानी असून त्यांची चर्चा सुरू आहे. (mandatai khadse first reaction on eknath khadses ncp joining)

संबंधित बातम्या:

बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या : एकनाथ खडसे

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार, खडसेंचं फडणवीसांकडे बोट

(mandatai khadse first reaction on eknath khadses ncp joining)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.