Pune Police | पोलिसांनी गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या, 86 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 579 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी 86 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे

Pune Police | पोलिसांनी गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या, 86 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुण्यात लॉकडाऊनच्या काळात गांजा तस्करी करणाऱ्यांच्या (Marijuana Smugglers Arrested) मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहो. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 579 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी 86 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे (Marijuana Smugglers Arrested).

याप्रकरणी पोलिसांनी धनाजी झिटे या गांजा तस्कराला अटक केली. मात्र, त्याचा साथीदार संतोष वाळुंज हा फरार झाला आहे. संतोष वाळुंजनं घराच्या तळघरात हा गांजा लपवून ठेवला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कारवाई प्रकरणी श्वानपथकाला दहा हजाराचा पुरस्कार

या कारवाईसाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली होती. श्वान पथकाने तळघराचा माग काढल्याने कारवाई यशस्वी झाली. या कारवाई प्रकरणी श्वानपथकाला दहा हजाराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात ही कारवाई करण्यात आली (Marijuana Smugglers Arrested).

कामशेतला संतोष आणि धनाजी गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने संतोष वाळुंजच्या घरावर धाड टाकली. मात्र, तो तिथून पसार झाला. पण, त्याचा साथीदार धनाजी झिटे हा पोलिसांच्या गळाला लागला. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे.

हा गांजा कुठून आणण्यात आला होता? या गांजाची कुठे विक्री केली जाणार होती? या तस्करीत कोणाकोणाचा समावेश आहे?, याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Marijuana Smugglers Arrested

संबंधित बातम्या :

राज्यातील कारागृहांना कोरोनाचा विळखा, 655 कैद्यांसह 211 कर्मचाऱ्यांना बाधा

Pune Lockdown | निर्बंध शिथिल होताच 698 पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, 16 दिवसात 14,915 जणांवर कारवाई

Published On - 10:11 pm, Tue, 21 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI