मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

मारुती सुझुकीने (Maruti suzuki car price decrease) बलेनो आरएसच्या (Baleno RS) किंमतीत कपात केली आहे.

मारुती सुझुकीच्या 'या' कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti suzuki car price decrease) बलेनो आरएसच्या (Baleno RS) किंमतीत कपात केली आहे. कंपनीने किंमतीत एक लाख रुपयांची कपात (Maruti suzuki car price decrease) केली आहे. याशिवाय कंपनी 65 हजारांचा डिस्काऊंट देत आहे. बलेनो आरएसचा (Baleno RS) सेल वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

बलेनो दोन प्रकारच्या पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. एक 1.2 लीटर व्हर्जन, दुसरी 1 लीटर आरएस व्हर्जन ज्यामध्ये 20 टक्के अधिक पॉवर मिळते. दरम्यान, या कारची किंमत सामान्य व्हर्जनपेक्षा 1.3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

मारुती सुझुकीच्या किंमतीत कपात केल्यानंतर बलेनो आरएसची एक्स शोरुम किंमत 7.9 लाख रुपये आहे. याशिवाय कंपनी 50 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. आरएसची विक्री यासाठी कमी झाली, कारण बरेच ग्राहक 1.2 लीटर इंजिनचा मॉडल खरेदी करतात.

या आठवड्यात मारुतीने काही निवडक मॉडलच्या किंमतीत पाच हजार रुपयांनी कपात केली आहे. यामध्ये Alto 800, Alto K10, Swift Diesel, Celerio, Baleno Diesel, Ignis, Dzire Diesel, Tour S Diesel, Vitara Brezza आणि S-Cross सारख्या गाड्यांचा समावेश होता.

“सणासुदीच्या काळात अशाप्रकारे नवनवीन ऑफर्सची घोषणा केल्याने ग्राहकांचे मनोबल वाढते. त्यामुळे अनेक ग्राहक गाड्या खरेदी करतात आणि बाजारात गाड्यांची मागणी वाढते. असे झाल्याने बाजारात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. गेल्याच आठवड्यात सरकारने कॉर्पोरेट कर कमी करण्यास सांगितल्यानतंर हे कपात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सरकारचे लक्ष हे ऑटो उद्योगातील मंदी दूर करणे हा आहे,” असेही कंपनीने म्हटलं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI