राज्यातील 90 टक्के ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर : धनंजय मुंडे

राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास 90 टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले (Sugarcane Worker Go Home Lockdown) आहेत.

राज्यातील 90 टक्के ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर : धनंजय मुंडे

मुंबई : राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Sugarcane Worker Go Home Lockdown)  यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. यानुसार राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास 90 टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. तर बीड जिल्ह्यातील 18 हजार मजूर आपापल्या गावी पोचले आहेत.

उर्वरित सर्व ऊसतोड मजूर बांधव येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील (Sugarcane Worker Go Home Lockdown)  अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हा सीमा प्रवेशाच्या चेकपोस्टवर अधिकृत नोंद झालेले 18 हजार ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले आहेत. यात उदयगिरी शुगर्स बामणी, सांगलीतून परळीत आलेल्या 18 पैकी दोन व्यक्तींना ताप आणि घशात खवखव अशी लक्षण आढळून आली आहेत. त्यांना तात्काळ आंबेजोगाई येथे कोरोना चाचणी (स्वॅब टेस्ट) साठी पाठवले आहेत तर उर्वरित व्यक्तींना परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र 1 लाख 24 हजार, नागपूर विभाग 5 हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर गावी, तर काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते. त्यापैकी आतापर्यंत 18 हजार 067 मजूर गावी परतले आहेत. त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. स्थानिक प्रशासनासह धनंजय मुंडे स्वतः आणि त्यांचे कार्यालयातील पदाधिकारी या बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान बाहेरून परतलेल्या ऊसतोड मजुरांना गावकरी व प्रशासनातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी. ऊसतोड मजूर बांधवांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुले यांच्याशी जवळचा संपर्क टाळावा. तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले (Sugarcane Worker Go Home Lockdown)  आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI