मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

अनिश बेंद्रे

|

Updated on: Sep 01, 2020 | 11:22 AM

औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती MIM करणार आहे.

मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

Follow us on

औरंगाबाद : अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी न दिल्याने एमआयएम आक्रमक झाली आहे. मंदिरं-मशिदी उघडण्यासाठी एमआयएमने मोहीम हाती घेतली आहे. (MIM requests to open Aurangabad Temples)

मंदिरं उघडण्यासाठी पुजाऱ्यांना एमआयएम निवेदन देणार आहे. औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम उद्यापासून सुरु होणार आहे.

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिले होते.

“जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.

“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले होते. (MIM requests to open Aurangabad Temples)

दरम्यान, मशिदी उघडणार असं म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवाल नाशिकमधील साधू महंतांनी विचारला होता. एमआयएम आणि सरकारची मिलीभगत आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला होता.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी काल पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं.

संबंधित बातमी :

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

(MIM requests to open Aurangabad Temples)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI