पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या, अजित पवारांच्या सूचना

पालकमंत्री असल्याने दत्ता भरणेंना परवानगी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. (Minister Datta Bharane to be present in Pandharpur Vitthal Mahapooja)

पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या, अजित पवारांच्या सूचना
अनिश बेंद्रे

|

Jun 30, 2020 | 8:40 AM

पुणे/पंढरपूर : आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पाडणार आहे. तर ठाकरे सरकारमधील मंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित असतील. (Minister Datta Bharane to be present in Pandharpur Vitthal Mahapooja)

विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दत्ता भरणे वगळता इतर कोणालाच मंदिरात परवानगी देऊ नये, असं बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री असल्याने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

मानाच्या पालख्यांचे नियोजन

दरम्यान, राज्यभरातील आषाढी वारीसाठी 9 मानाच्या पालख्यांचे नियोजन झाले आहे. या पालख्या आज (30 जून) पंढरपूरमध्ये पोहोचतील. त्या पालख्या कशा न्यायच्या, याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसोबत आषाढीच्या महापूजेचा मान सफाई कर्मचारी दाम्पत्याला द्या”

देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 335 वा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला. पहाटे चार वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे काकड आरती, तुकाराम महाराजांच्या पादुकांना अभिषेक, त्यानंतर विठुरायाची आणि पादुकांची महापूजा संपन्न झाली.

बसने प्रस्थान केल्यानंतर पालखी इनामदार वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. तिथं धार्मिक विधी होतील. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान करणार आहे.

पंढरपूरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. आजच्या दिवसात सात कोरोना रुग्ण आढळल्याने पंढरपूर शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता नऊवर गेली आहे. यामध्ये एका बँकेच्या दोन संचालकासह त्यांच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे.

(Minister Datta Bharane to be present in Pandharpur Vitthal Mahapooja)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें